पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या

TDNTDN
Dec 10, 2024 - 09:49
 0  6
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी- संतांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी असते ,महाराष्ट्र ही जशी वीरांची भूमी आहे तशीच ती महान संतांचीही भूमी आहे, या संत परंपरेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा लिखाणाचे महत्वपूर्ण कार्य करणारे थोर संत संताजी जगनाडे महाराज यांचे विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराजांच्या समाजोपयोगी विचारांनी प्रेरित झालेल्या संत जगनाडे महाराज यांनी भजन, किर्तनाबरोबरच आयुष्यभर समाजातील अनिष्ट रूढी ,परंपरा निर्मुलनाचे  कार्य केले असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर  यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर संत संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्यावेळी ते बोलत होते.

आकारणी न झालेल्या मालमत्तांधारकांनी तात्काळ कागदपत्रांची पुर्तता करावी !

या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी चिंचवड तेली समाज संस्थापक बाळासाहेब शेलार, अनिल राऊत, डाॅ.गणेश अंबिके, शिवराज शेलार, प्रदीप सायकर, बापू चौधरी, संजय शेलार, राजाराम खानविलकर, सचिन चौधरी, संजय जगनाडे, शुभम खानविलकर, समर्थ शेलार,बापू चौधरी, राजेश खानविलकर,राहुल खानविलकर,राजाराम वंजारी,सचिन काळे,अमित खानविलकर,रामभाऊ खानविलकर,प्रथमेश आंबेरकर, किशोर कर्डीले, विजय महाडीक,अनिता गायकवाड,सरोज अंबिके, सोनाली खानविलकर,नेहा शेलार तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या महान कार्याची दखल घेऊन त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.भारतीय टपाल सेवेने देखील त्यांचे स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले आहे .

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow