हुंडा व घटस्फोटासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे, डॉक्टर मामा मामीविरोधात गुन्हा दाखल
सासरच्या मंडळींनी लग्नामध्ये दागिने व उर्वरित पाच लाख रुपये दिले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून त्याप्रमाणे अनैसर्गिक शारीरिक संबंध निर्माण करत सहमतीविना आक्षेपार्ह फोटो काढले. तसेच फिर्यादी गर्भवती असताना पतीच्या मामी डॉ. चिनार बहिरट यांनी मोशी येथिल अनामय हॉस्पिटल येथे तपासणी करून गर्भाची वाढ होत नसल्याचे कारण देत गर्भपात केला. फिर्यादी यांना दुसऱ्या वेळी मुलगाच व्हावा यासाठी सासूने मृत्यूची भीती दाखवून मंतरलेली राख प्रसाद म्हणून तब्बल चार महिने दर अमावस्येवेळी खाऊ घातली. करणी, भूतबाधा, जादूटोणा यासारखी अघोरी कृत्ये करत त्रास दिला. दुसऱ्या गरोदरपणावेळी डॉ. बहिरट मामा आणि मामी यांनी त्यांचे आळंदी येथिल बहिरट नर्सिंग होम येथे गर्भलिंग निदान केले. पतीचे विवाहबाह्य संबंध समजल्यामुळे त्याबाबत विचारल्यावर गरोदर असतानाच शिवीगाळ करत पोटावर लाथांनी मारले. सासू नातवाच्या पिग्गी बँक मधील पैसे चोरत असे व ते सुनेने पकडले. वारंवार विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने विवाहितेला घरातील गॅलरीत केस धरून ओढत नेत खाली ढकलून देईल व तु स्वत:च आत्महत्या केल्याचे सर्वांना सांगेन अशी जीवे मारण्याची धमकी दिली. मी आमदार खासदारांसोबत उठतो बसतो, पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे असेल धमकावले व तिला घराबाहेर काढले आणि घटस्फोट घेण्यासाठी तगादा लावला. तसेच पती व सासऱ्याने सायली तागुंदे आणि तिच्या घरच्यांना तिच्या घरी जावून त्याचा घटस्फोट झाल्याचे सांगून सोबत रहाण्यासाठी घेऊन आला व सोबत राहिला.
What's Your Reaction?