वार्षिक क्रीडा स्पर्धा २०२४ -२५ उद्घाटन समारंभ संपन्न.
सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजन
पिंपरी-चिंचवड (पुणे ):- जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित सौ, ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. यानिमित्त जैन विद्या प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी राजेन्द्रकुमार शंकरलाल मुथा व सहायक सेक्रेटरी अनिलकुमार मोतीलाल कांकरिया आणि सौ. रश्मीताई राजेंद्रकुमार मुथा यांनी विद्यार्थिनींना क्रीडा स्पर्धेनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय खेळाडू कु.माहेश्वरी अनिल मगर व पत्रकार महेश मंगवडे उपस्थित होते.
या शाळेच्या माजी विद्यार्थिनी कु. माहेश्वरी मगर यांनी त्यांच्या खेळाच्या कारकिर्दीतले अनुभव सांगून विद्यार्थिनींना प्रेरित केले. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग दिसून येत आहे. मग कला, क्रीडा सांस्कृतिक, राजकारण असो किंवा इंजिनीयर, डॉक्टर वकील असो या सर्वच क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो सद्या क्रीडा क्षेत्रामध्ये ही महिलांचे वर्चस्व पाहायला मिळत असून अभ्यासाबरोबर खेळाकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे असे मत माहेश्वरी मगर यांनी व्यक्त केले.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी व सर्वसाधारण सभेत दिली मंजूरी
आजची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी जात आहे त्यामुळे बऱ्याचश्या तरुण-तरुणींना आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. आज जर पहिले तर आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषाबरोबर एक पाऊल पुढे असलेल्या दिसून येत आहेत. खरं पाहिलं तर याच वयामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आपले भविष्य घडवायचा आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थी जीवनात असताना अभ्यासाबरोबर खेळाकडे ही तितक्याच प्रमाणात लक्ष देणे गरजेचे आहे असे मत पत्रकार महेश मंगवडे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या भारती मॅडम यांनी देखील क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच जीवनातील खेळाचे महत्व सांगून खिलाडू वृत्ती जपण्यास सांगितले व सर्व खेळाडू विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख सौ. वसुधा पवार , सूत्रसंचालन सौ. प्रज्ञा आचार्य ,आभार प्रदर्शन सौ आशा डुंबरे यांनी केले .
What's Your Reaction?