जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडी, माण चे उत्तुंग यश!
हिंजवडी (पुणे ) कासार आंबोली येथे झालेल्या पुणे जिल्हा परिषद यशवंतराव कला क्रीडा मोहोत्सव मध्ये तालुकास्तरीय स्पर्धा पार पडल्या.यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडी, माण. केंद्र रिहे.
यांनी मुलांचा खो खो या गटात संपूर्ण मुळशी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला.
विशेष बाब म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडी, माण केंद्र रिहे या शाळेस मुलांना खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे ग्राऊंड उपलब्ध नाही. मिळेल त्या जागेत सर्व मुलांनी खेळाचा सराव करून प्रथम केंद्रस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवाला.
महायुतीच्या आमदारांची आरएसएसमध्ये बैठक, अजित पवारांच्या सहभागावर प्रश्न!
तदनंतर जांबे या ठिकाणी बीट स्तरावरील स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवला आणि तालुका स्तरासाठी पात्र झाले.अगदी कमी वेळात आणि कमी जागेत या बालचमुंनी खेळाचा सराव करून आपल्या गावचे शाळेचे आणि शिक्षकांचे आणि पालकांचे नाव गाजवले.
खेळाडूंचे विजयाननंतर गावात ग्रामस्थ पालक यांनी मोठ्या उत्सहाने स्वागत केले.
शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजू गवारे यांनी सर्व खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षकांना प्रोत्साहन पर जेवण दिले.
पालक, ग्रामस्थ आणि मुलांच्या इच्छा शक्ती च्या जोरावर हे यश मिळाल्याचे मार्गदर्शक शिक्षक मिलिंद ताठे सर यांनी सांगितले.
शाळेला मैदान नसतानाही मुलांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणे हे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे , अंगात कौशल्य असतील तर कुठल्याही सुखसोयी ची गरज भासत नाही हेच या मुलांनी आज सिध्द केले असल्याचे मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती कविता आनंदा जगताप यांनी सांगितले.
दुहेरी सबवे बोगदा प्रकल्पाविरुद्ध जनहित याचिका: RMC प्लांट स्थलांतरित करण्याची मागणी
शाळा व्यवस्थापन समिती गवारेवाडी, माण ग्रामपंचायत सदस्या सौ अर्चनाताई गवारे,
पालक आणि ग्रामस्थांनी मुलांचे खूप कौतुक केले तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे आभार मानले.
What's Your Reaction?