प्रा रामकृष्ण मोरे महाविद्यालयांमध्ये भूगोल सप्ताहाचे उद्घाटन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आकुर्डी येथे भूगोल सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले अशी माहिती भूगोल विभाग प्रमुख डॉ सुचित्रा परदेशी व महाविद्यालयाचे प्राचार्य अभय खंडागळे यांनी दिली.
भूगोल सप्ताहाचे उद्घाटन भौगोलिक प्रतिकृती व पोस्टर प्रदर्शनाने करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत मगर (शैक्षणिक समन्वय उच्च शिक्षण विभाग पुणे) यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भूगोल व पर्यावरण या विषयाशी संबंधित ७० पोस्टरचे सादरीकरण केले.
सदर उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्या मनोगतांमध्ये डॉ प्रशांत मगर यांनी विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या प्रकल्पांचे कौतुक केले. तसेच भूगोल विषयाचा विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी पुढे येऊन काम केले पाहिजे असा आशावादही व्यक्त केला.
सदर उपक्रमामध्ये प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापन या विषयावर मा आप्पासाहेब धनके (सीनियर एक्झिक्यूटिव्ह, सी एस आर, बिसलरी इंडिया लिमिटेड पुणे) यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानामध्ये बिसलरी कंपनीद्वारे प्लास्टिक व्यवस्थापनावरती सी.एस.आर. फंडातून केल्या जाणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. आपल्या व्याख्यानामध्ये प्लास्टिकच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचे मानवी आरोग्य, वनस्पती तसेच प्राणीजीवन यावर होणारे परिणाम प्रामुख्याने समुद्रातील जीवांवरती होणाऱ्या परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर उपाययोजना म्हणून प्रत्येक नागरिकाने घरामध्ये प्लास्टिकच्या वस्तू गरज असेल तरच खरेदी कराव्यात याचबरोबर कचऱ्यामधून बाहेर जाणारे प्लास्टिक हे वर्गीकरण होऊनच बाहेर गेले पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयीन युवकांनी प्लास्टिक पासून निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जावी असेही त्यांनी आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांबाबत अभ्यास करावा असे मत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या प्लास्टिक संकलनामध्येही विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभिप्रेत असलेले कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम नक्कीच समाज व विद्यार्थ्यांना उपयोगाचे ठरतील असेही मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा डॉ सुचित्रा परदेशी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अमोल बिबे यांनी व डॉ रमेश गोपाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. केले तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा भगवंता स्वामी, प्रा कल्याणी खेतमाळीस, प्रा प्रसाद झिंगरे, प्रा समीक्षा अंभोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?






