बदला घेण्यासाठी बाळगले पिस्टल एक पिस्टल व एक राऊंड जप्त गुन्हे शाखा, युनिट-३ कडून अटक

TDNTDN
Jan 12, 2025 - 13:27
Jan 12, 2025 - 13:27
 0  2
बदला घेण्यासाठी बाळगले पिस्टल एक पिस्टल व एक राऊंड जप्त गुन्हे शाखा, युनिट-३ कडून अटक

गुन्हे शाखा, युनिट ३. पुणे कडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाले बातमी वरून इसम नामे आकाश बळीराम बिडकर, वय २४ वर्षे, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, नवश्या मारूती जवळ, दत्तवाडी, पुणे यास दिनांक ११/०१/२०२५ रोजी १२/०५ वा. डीपी रोडवरील बस स्टॉपसमोर, एरंडवणा, पुणे येथे पकडून त्याचेकडून एक देशी बनावटीचे पिस्टल, एक राऊंड असा एकुण ४०,५००/- रू किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

नमुद आरोपीकडे केले तपासात आरोपी आकाश बळीराम बिडकर याचा चुलत मामा बरोबर जमिनीच्या कारणावरून वाद असल्याने व त्याने जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने त्याने सदरचे पिस्टल हे आरोपी नामे सुभाष बाळु मरगळे वय २४ वर्षे रा. स.नं.४६, मरगळे हाऊस, जाधव नगर, वडगाव बु. पुणे याचे मध्यस्थीने पाहिजे आरोपी रा. हडपसर, पुणे याचेकडून विकत घेतले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नमुद दोनही आरोपींना अटक केली असून पाहिजे आरोपीचा शोध सुरू आहे. पाहिजे आरोपी हा पोलीस अभिलेखावरील आहे. 

नमुद आरोपींवर अलंकार पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०५/२०२५ आर्म अॅक्ट ३,२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, पुणे शहर मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे पुणे शहर मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १. श्री. गणेश इंगळे पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार शरद वाकसे, संजिव कळंबे, सुजित पवार, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे, सोनम नेवसे यांचे पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow