बिबवेवाडी पोलीसांनी प्लॅस्टिक नायलॉन सिंन्थीटीक नायलॉनचा मांजा विकण्या-या इसमांकडून ५० रिळ मांजा जप्त करून केला गुन्हा दाखल

TDNTDN
Jan 12, 2025 - 13:15
Jan 12, 2025 - 13:16
 0  2
बिबवेवाडी पोलीसांनी प्लॅस्टिक नायलॉन सिंन्थीटीक नायलॉनचा मांजा विकण्या-या इसमांकडून ५० रिळ मांजा जप्त करून केला गुन्हा दाखल

सदर बाबत पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ चे नुसार तसेच मा.पोउआ/वि.शा/जातीय/१३१/२०२५ पोलीस उप आयुक्त विशेष शाखा पुणे शहर यांचे कार्यालयाकडील दि.०४.०१.२०२५ चे भा.ना.सु.र.संहिता २०२३ चे कलम १६३ चे प्रतिबंधक आदेशान्वये पुणे शहर आयुक्तालयात दि.०४.०१.२०२५ ते ०२.०२.२०२५ पर्यत प्लॅस्टिक नायलॉन सिन्थेंटिक मांजा ने पक्षी व मनुष्यास होणारे इजा (दुखापत) पासून संरक्षण व्हावे या करीता संबंधित प्रतिबंधीत मांजा जवळ बाळगणेस, त्याचा वापर व विक्री करण्यास मनाई आदेश काढलेले आहेत. चायनीज प्रतिबंधीत मांजा विक्रि करण्याराचा शोध घेवून पुढील कारवाई करणेबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे पोलीस उप निरीक्षक येवले व स्टाफ असे बिबवेवडी पोलीस ठाणे येथून प्रतिबंधीत मांजा विक्री करणारे इसमांचा शोध घेण्यासाठी निघालो असता पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे यांना मिळालेल्या बातमीवरून चैत्रबन वसाहत, झेंडे यांचे घराचे जवळ, पासलकर कमानीचे जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे येथे एक पडीक रुममध्ये इसम नामे पृथ्वीराज राजेश म्हस्के वय-२३ वर्षे रा. सिध्दार्थनगर, जुना बसस्टॉपचे मागे, अप्पर बिबवेवाडी पुणे हा १०,०००/- रु. प्लॅस्टिक नायलॉन सिंन्थीटीक नायलॉनचे विविध रंगाचे मांझाचे ५० रिळ हा प्रतिबंधित मांजाचा विक्री करीता साठा स्वतःचे कब्जात ठेवून मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्रमांक ०३/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम २२३, १२५, तसेच पर्यावर संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री.धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow