दोन वर्षापासुन मोका गुन्हयामध्ये फरार असलेला येनपुरे गँगचा म्होरक्या पप्पु येनपुरे याच्या भारती विद्यापीठ पोलीसांनी बारामती येथुन आवळल्या मुसक्या
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गु.र.नं.७९८/२०२३ भा.द.वि. कलम ३९५,३२६,१४३,१४७, १४९,५०४,५०६(२), सह क्रिमीनल लॉ अर्मेन्टमेन्ट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) या गुन्हयातील टोळी प्रमुख पप्पु ऊर्फ प्रविण अनंता येनपुरे, वय ३० वर्षे, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुा, पुणे हा मागील दोन वर्षापासुन फरार होता. तो कोणताही सोशल मिडीया व मोबाईल फोनचा वापर करीत नसल्यामुळे त्यास पकडण्यास अडचणी निर्माण होत होत्या. नमुद आरोपीस पकडण्यासाठी भारती विद्यापीठ पोलीसांनी वेळोवेळी सापळे लावुन त्यास पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो मिळुन येत नव्हता.
नमुद गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे पाहीजे आरोपी पप्पु ऊर्फ प्रविण अनंता येनपुरे, याचेकडुन एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. डी. एस. पाटील यानी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी यांना तात्काळ शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार नमुद आरोपीचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी यांना आरोपी हा निरा वागस, बारामती, जि. पुणे येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी आला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी गुन्हयाचे तपासी अधिकारी मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आगारे यांचे ताब्यात देण्यात आले असुन त्यांनी सदर आरोपीतांना नमुद गुन्हयामध्ये अटक केली आहे.
सदरची कामगिरी गा अपर पोलीरा आयुक्त पश्चिग प्रादेशीक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि. २. श्रीमती रगार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, याचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी. एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुलकुमार खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, चेतन गोरे, मितेश चोरमोले, सागर बोरगे, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.
What's Your Reaction?