१९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप - प्रा. नितीन बानुगडे पाटील
“न घाबरता सतत अभ्यास... भरपूर सराव... स्वतःवर आणि आयआयबीवर विश्वास... हा यशाचा राजमार्ग
आहे”. यशाचे रहस्य मागे न पडणे आणि अथक परिश्रम करणे हे आहे आणि जर तुम्ही ते पाळले तर डॉक्टर,
इंजिनिअर बनण्याचा तुमचा निर्धार सार्थ ठरेल. प्रेरणा आत्मविश्वास वाढवते आणि इच्छुकांना नवीन उत्साहाने
त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करते, त्यासाठी सतत मेहनत करून मन स्थिर ठेवावे, असे प्रेरणादायी
आवाहन प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे यांनी आयआयबीच्या ‘विजयी भव’ कार्यक्रमा
मध्ये केले.
महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी करिअर इन्स्टिटयूटच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित पिंपरी, पुणे
येथील आयआयबी विद्यासंकुलच्या परिसरातील मैदानावर प्राध्यापक, लेखक, इतिहास अभ्यासक नितीन
बानुगडे यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम "विजयी भव !" रविवारी (दि. १२) आयोजित करण्यात
आला होता, त्याप्रसंगी प्रा.बानुगडे बोलत होते.
प्रारंभी माँ जिजाऊ, स्वामी विवेकानंद, बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती एन. एस. लोहारे यांच्या प्रतिमेला
पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी
व्यासपीठावर टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष कामगार नेते सचिन लांडगे, डीसीपी पुणे बापू बांगर,
इन्स्टिटयूटच्या संचालक दशरथ पाटील, नगरसेवक, मा. उपमहापौर तुषारभाऊ हिंगे, मा. उपमहापौर
हिराबाई नानी घुले, नांदेड व्यवस्थापन टीमचे वाकोडे पाटील, बालाजी कदम, श्री. बनवारी, आयआयबी
आयआयबी पुणे चे संचालक ॲड. महेश लोहारे, संत तुकाराम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.
कुंभार, नगरसेविका निर्मलाताई गायकवाड, उद्योजक निसार सुतार, गंगाधर मंठाळे, भाजपा लीगल सेल
उपाध्यक्ष, ॲड. मंगेश लोहारे, दैविक मंठाळे आणि शिक्षकांची प्रमुख उपस्थिती होती.
‘पर्पल जल्लोष’ मध्ये नवउद्योजकांकडून विविध कल्पनांचे होणार सादरीकरण !
पुढे बोलतांना श्री. नितीन बानुगडे म्हणाले की, भीती तुम्हाला मागे खेचते, भीतीवर विजय मिळविण्यासाठी
त्यावर आक्रमण करा. जे सोपे आहे, ते जमणारच आहे, जे जमत नाही त्यावर आक्रमण करा, ही अभ्यासाची
सर्वात मोठी पद्धत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, भिणाऱ्याला सर्वच घाबरवतात; पण निर्भय माणसासमोर संकटे
सुद्धा शरण येतात. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयायापासून दूर जायलाच नको, हेच सर्वात मोठे यशाचे कारण
आहे. डॉक्टर्स, इंजिनिअरचे ध्येय ठरलेय ना? तर इतरत्र भटकू नका. मन स्थिर ठेऊन अभ्यास करा. ध्येय ठरवा,
मेहनत करा यश निश्चित मिळेल. ते पुढे म्हणाले की, आजकाल विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे व्यसन लागले असून,
शैक्षणिक जीवनात ते घातक ठरू शकते, यासाठी पालकांनीही अग्रेसर भूमिका निभावणे गरजेचे आहे. आजकाल
विद्यार्थ्याना कोणते मित्र चांगले, कोणते वाईट कळणे झाले. त्यामुळे तुमची संगत चांगली ठेवा, जेणेकरून
तुमचा शैक्षणिक प्रवास सुखकर होईल, त्यासाठी डॉक्टर्स, इंजिनिअर होण्याच्या कार्यकाळात आयआयबी
तुमच्या सदैव पाठीशी आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी
विद्यार्थ्यांच्या मनात नव्या उत्साहाचा संचार केला आणि विजयी भव : या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना
आत्मविश्वास, प्रेरणा आणि यशस्वी भविष्याची दिशा मिळाली. कार्यक्रमास विविध शाळेचे मुख्याध्यापक,
शिक्षक तसेच पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर शेवटी आभार
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश कुमदाळे यांनी मानले.
कार्यक्रमास नगरसेवक, गोपीआण्णा धावडे, अंकुशआप्पा लोंढे, संतोष नाना लांडगे, संतोष फुगे, जितेंद्र लांडगे,
अनिल आण्णा लोंढे, हेमंतभाऊ फुगे, मल्हार दादा लांडगे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. पडवळ, सचिव
गलांडे, संतोष काळे, हणमंत आगे, सतीश देवरे, ॲड. रुपाली वाघिरे, सुमित सतीश लांडगे, उदय गायकवाड,
जितेंद्र यादव, विठ्ठल महाराज गवळी, मृदंग मणी, विशाल महाराज फुगे, निलेश फुगे यांची उपस्थिती होती.
बातमीची चौकट
==========
दिनांक १९ जानेवारी रोजी तब्बल २५०० विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप-ॲड. महेश लोहारे
महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेला महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी ही शैक्षणिक संस्था दरवर्षी निकालाची
परंपरा कायम ठेवत आली असून, दरवर्षी आयआयबी कडून महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्कॉलरशिप फास्ट
परीक्षा घेतली जाते. इ. १० वी तुन इ. ११ वीमध्ये मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट परीक्षा म्हणजे
स्वतःला सिध्द करण्याचा राजमार्ग आहे. आयआयबीच्या "इम्पावरिंग नेशन थ्रू एजुकेशन" या घोष वाक्याला
साजेसा हा उपक्रम आयआयबीकडून दरवर्षी राबविला जातो. इ. १० वी तुन इ. ११ वी मध्ये जाणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी रविवारी, १९ जानेवारी रोजी स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या
परीक्षेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उपस्थित राहून स्कॉलरशिप
मिळवावी, असे आवाहन आयआयबी करिअर इन्स्टिटयूटचे पुणे विभागाचे संचालक ॲड.महेश लोहारे यांनी
केले.
What's Your Reaction?