"पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी वाहतूक शाखेतील महिला पोलीस अमंलदारांनी केली कौतुकास्पद कामगिरी "

TDNTDN
Dec 2, 2024 - 19:36
Dec 2, 2024 - 19:37
 0  15
"पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी वाहतूक शाखेतील महिला पोलीस अमंलदारांनी केली कौतुकास्पद कामगिरी "

दिनांक ०१/१२/२०२४ रोजी हिंजवडी वाहतूक, पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस अमंलदार महिला पोलीस हवालदार १६२४ नीलम विजय चव्हाण व मपोशि १६२३ रेश्मा नजीर शेख यांना वाकड नाका येथे कर्तव्यावर हजर असताना वाकड नाका येथे महिला नामे राजश्री माधव वाघमारे, वय २५ वर्षे, या गरोदर असल्याने औंध हॉस्पिटल येथे जात असताना अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. 

सदरवेळी वाकड नाका येथे महिला पोलीस अमंलदार महिला पोलीस हवालदार १६२४ नीलम विजय चव्हाण व मपोशि १६२३ रेश्मा नजीर शेख यांनी सदर महिलेची परिस्थितीनी गांभीर्याने दखल घेत प्रसंगावधानाने अॅम्बुलन्स व डॉक्टरांशी संपर्क करुन तिला जवळच असलेल्या खोलीमध्ये नेवून वैद्यकीय अधिकारी यांनी तिचे मुलाला सुखरुप जन्म दिलेला आहे.

त्यानंतर अॅम्बुलन्स व डॉक्टर हे आलेनंतर सदर महिलेची व बाळाची पाहणी करुन पुढील औषध उपचार करणेकामी औंध हॉस्पिटल येथे घेऊन गेले. महिला पोलीस हवालदार १६२४ नीलम विजय चव्हाण व मपोशि १६२३ रेश्मा नजीर शेख, या महिला पोलीस अमंलदार यांचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, यांनी पुष्पगुच्छ देवून कौतुकास्पदाची थाप दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow