नवीन वर्ष साजरे करा मात्र कायद्याचा सन्मान ठेवून.
वाकड - हिंजवडी, काळेवाडी पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये.
पिपंरी - चिंचवड :- नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वाकड हिंजवडी काळेवाडी परिसरातील हॉटेल्स आणि ढाबे चालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगळेवेगळे पॅकेज ची घोषणा केली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी केली जात आहे. महाराष्ट्र शासनाने यावर्षी हॉटेल्स आणि वाईन्स चालकांना रात्रभर हॉटेल चालू करण्यासाठी परवानगी दिली आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी ग्राहक दारूचे पॅक वरती पॅक रात्रभर रिचवताना दिसून येणार आहेत.
त्याच बरोबर रात्रभर चालणाऱ्या धांगडधिंगा वरती लक्ष ठेवण्यासाठी वाकड हिंजवडी काळेवाडी पोलीस प्रशासन सज्ज झाले दिसून येत आहे.कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासने कंबर कसली आहे. सर्व हॉटेल्स,ढाबे यावरती स्थानिक पोलीस प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून काही अनुसूचित प्रकार घडला तर गुन्हे दाखल करण्याची तयारी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
हिंजवडी वाकड काळेवाडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेलची संख्या वाढली असून आयटी परिसर तसेच पुण्यातील काही परिसरातील ग्राहकांचा ओढा नेहमीच आयटी पार्क मधील हॉटेल कडे असतो या कारणामुळे या परिसरात विकेंड, ख्रिसमस नवीन वर्षासाठी या परिसरातील हॉटेलमध्ये ग्राहकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळत असते याचाच तान पोलीस प्रशासन आणि ट्राफिक समस्या वरती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो.
पिंपरी चिंचवडमध्ये अपंगत्वाबाबत जनजागृती करणारा 'जांभळा जल्लोष' महोत्सव
महाराष्ट्र शासनाने हॉटेल्स आणि वाईन शॉप ला रात्रभर आस्थापने चालू ठेवण्यासाठी परवानगी दिली असून यासंदर्भात हॉटेल मालक आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्यात एक बैठक घेण्यात आली यामध्ये काही सूचना हॉटेल चालकांना करण्यात आले आहेत यामध्ये जास्त ड्रिंक करणाऱ्या ग्राहकांना राहण्याची अथवा घरी सोडण्याची संपूर्ण जबाबदारी हॉटेल चालकाची असेल काही अनुसूचित प्रकार घडला तर स्थानिक पोलीस स्टेशनला लगेच कळवण्यात यावे तसेच कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची सर्व जबाबदारी हॉटेल चालकाची असेल महिला व पुरुष सुरक्षारक्षक यांची नेमणूक स्वतः हॉटेल चालकांनी करावी अशी सूचना वजा इशारा स्थानिक पोलिसांनी हॉटेल चालकांना या बैठकीमध्ये देण्यात आला आहे.
प्रतिक्रिया:- या सर्व काळामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन ऑन ड्युटी 24 तास फिल्ड वरती असून बीट मार्शल यांची गस्त वाढवण्यात आले आहे तसेच परिसरातील महत्त्वाच्या चौकामध्ये गर्दी निर्माण होत असेल अशा चौकामध्ये नाकाबंदी लावण्यात आले आहे. कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये याची संपूर्ण खबरदारी घेतली असून जर का कोणी ड्रिंक आणि ड्राईव्ह मध्ये आढळला असेल तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील. - ( निवृत्ती कोल्हटकर )वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन
प्रतिक्रिया:- नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत जरूर करावे मात्र आपण करत असलेल्या स्वागताचा इतरांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. हिंजवडी आयटी पार्क मध्ये हॉटेलची संख्या मोठ्या प्रमाणात असून कुठेही अनुसूचित प्रकार घडू नये यावरती हिंजवडी पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे. जर का खोटे अनुसूचित प्रकार घडला तर वेळप्रसंगी हॉटेल चालक तसेच ग्राहकांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.- ( कन्हैया थोरात ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन.
प्रतिक्रिया :- काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या अति संवेदनशील भागामध्ये काळेवाडी पोलीस स्टेशन कडून ऑन ड्युटी 24 तास पोलिसांची गस्त असणार आहे. महत्त्वाच्या चौकामध्ये नाकाबंदी असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली जाणार आहे. तसेच बीट मार्शल कडून सतत गस्त वाढवली जाणार असून कारवाई करत असताना कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. - (राजेंद्र बहिरट) वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेवाडी पोलीस स्टेशन
नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्रभर एन्जॉय करावा मात्र दारू पिऊन कुणीही रस्त्यावरती गाडी चालवू नये तसेच हिंजवडी वाकड सांगावी वाहतूक विभागाकडून जागोजागी नाकाबंदी लावण्यात आली असून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून गाडीची तपासणी केली जाणार आहे. रस्त्यावरती दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वाहतूक विभागाकडून कुठेही ट्रॅफिक जाम होणार नाही याची संपूर्ण खबरदारी घेतलेली आहे.- (बापू बांगर ) उपायुक्त वाहतूक विभाग
What's Your Reaction?