खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी

 मावळ तालुक्यातील प्रसिध्द बैलगाडा मालक श्री पंडीत जाधव यांचे अपहरण करून खून केला व त्यांचा मृतदेह जाळून त्याची विल्हेवाट लावुन खंडणीचा बनाव करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवून गुन्हा उघड केलेबाबत..

TDNTDN
Nov 22, 2024 - 06:39
 0  8
खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक, गुन्हे शाखेची कामगिरी

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. देवेंद्र चव्हाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतून इसम नामे श्री पंडीत रामचंद्र जाधव चय-५२ वर्षे रा. मु. जाधववाडी डॅमजवळ, पो. नवलाख उंब्रे ता. मावळ, जि. पुणे हे दिनांक १४/११/२०२४ रोजी पासून बेपत्ता असून, अज्ञात इसम त्याचे नातेवाईकांकडे पंडीत जाधव यांचे व्हाटसअॅपवर नंबरचा वापर करुन त्यांचे नातेवाईकांकडे ५० लाख रुपयाची मागणी करत आहे. सदरची माहिती प्राप्त झाल्याने, त्याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना कळवुन मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री देवेंद्र चव्हाण, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे व त्यांचेकडील स्टाफ असे तळेगाव एमआयडीसी परीसरात जावून, तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांना भेटून, त्यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी इसम हा पंडीत जाधव यांच्या मोबाईलचा व्हाटसअॅपवरुन पैश्याची मागणी करत होता.

 श्री पंडीत जाधव यांचे बंद मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच परीसरातील सिसिटीव्ही चेक केले व तसेच बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून सुरज वानखेडे यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची माहिती प्राप्त झाली. गुन्हयातील आरोपी याचे नाव निष्पन्न करुन आरोपी नामे सुरज मच्छिंद्र वानखेडे, वय २३ वर्षे सध्या रा. पंडीत जाधव यांचे खोलीत, मु. जाधववाडी, पोस्ट-नवलाख उंब्रे, ता. मावळ, जि. पुणे यास तो गावी पळुन जाण्याच्या तयारीत असताना बधलवाडी, नवलाख उंब्रे ता मावळ जि पुणे येथुन ताब्यात घेवून, त्याचेकडे केलेल्या चौकशीवरुन त्यास विश्वासात घेवून त्याने तो व त्याचा मित्र रणजीत कुमार रा बिहार याच्या मदतीने प्रसिध्द गाडा मालक पंडीत रामचंद्र जाधव वय-५२ वर्षे यांचे ५० लाख रूपयाची खंडणी मागीतल्याचा बनाव करुन अपहरण केले व त्यांचा दि. १४/११/२०२४ रोजी रात्री तळेगाव एमआयडीसी परीसरात वैयक्तीक कारणावरून दोरीने गळा आवळून खुन केला. मयत यांची फॉर्चुनरगाडी ही मयत यांनी मागीतली असल्याचे त्यांचे कुटुंबीयांना भासवुन त्याच गाडीमध्ये मयत यांचा मृतदेह टाकुन त्यांचे मृतदेहाचा वहागाव ता. खेड जि. पुणे येथील डोंगरावर मृतदेह जाळुन त्याची विल्हेवाट लावली व गाडी पुन्हा मयत इसमाचे घराचे परीसरात लावल्याचा तपासात निष्पन्न झाल्याने खंडणी विरोधी पथकाकडून गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघड करण्यात आला असुन आरोपीकडुन गुन्हयात वापरलेले पाच सिमकार्ड व दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

 नमुद गुन्हयात खुन करुन पुरावा नष्ट करणे याप्रमाणे कलमवाढ करण्यात आली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास तळेगांव एमआयडीसी पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, मा. पोलीस सह-आयुक्त, डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२. श्री.बाळासाहेब कोपनर, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, डॉ. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि सुनिल भदाणे, पोलीस हवा सुनिल कानगुडे, प्रदिप पोटे, किरण काटकर, प्रदिप गोंडाबे, किशोर कांबळे, किरण जाधव, अशिष बोटके, चंद्रकांत जाधव, व तांत्रिक विश्लेषन विभागाचे श्री नागेश माळी व पोपट हुलगे यांचे पथकाने केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow