पिंपरी चिंचवडमध्ये अपंगत्वाबाबत जनजागृती करणारा 'जांभळा जल्लोष' महोत्सव
17 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम असतील.
पिंपरी, दि. ३० डिसेंबर २०२४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १७ ते १९ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पर्पल जल्लोष- दिव्यांगाचा महाउत्सव’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज नियोजनाबाबत संनियंत्रण समिती बैठक पार पडली.
पोलिसांनी केला मोठा खुलासा, 2000 च्या नोटा बदलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, सहशहर अभियंता बाबासाहेब गलबले, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, कैलास दिवेकर, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रझिया खान, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग भवन फाउंडेशनचे सल्लागार विजय खान्हेकर, अभिजित मुरुगकर, गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, प्रहार दिव्यांग संघटनेचे राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, महिला अध्यक्ष संगीता जोशी यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
करसंकलन विभागाकडून दोन दिवसात तब्बल 128 मालमत्ता जप्त!
या बैठकीत ‘पर्पल जल्लोष’ अर्थात ‘उत्सव दिव्यांगत्वचा’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नियोजनाबाबत सर्वंकष चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी योग्य समन्वय ठेवून नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी आदी सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या कार्यक्रमासाठी विविध समित्या स्थापन करण्यात येणार असून यामध्ये स्वागत, वाहतूक व मुक्काम, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, फूड कोर्ट, मिडिया, सुरक्षा, वैद्यकीय पार्किंग आदींचा समावेश आहे.
What's Your Reaction?