परिमंडळ ०५ कार्यक्षेत्रांतील पोलीस स्टेशनकडील वेगवेगळयां सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

Jan 17, 2025 - 10:01
Jan 17, 2025 - 10:01
 0  3
परिमंडळ ०५ कार्यक्षेत्रांतील पोलीस स्टेशनकडील वेगवेगळयां सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी व प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी आदेश दिलेले होते. सदर आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग व वानवडी विभागांचे अधिपत्याखाली येणारे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगारांवर दि. १६/०१/२०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस कायदा क. ५६प्रमाणे हद्दपार कारवाई करण्यात आलेली आहे. त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर या कार्यालयाकडून खालील नमुद प्रमाणे एकुण ०३ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा क. ५६ प्रमाणे हद्दपार कारवाई करण्यात आलेली असुन त्यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्ह्याचे हद्दीतुन हद्दपार करण्यात आलेले आहे.

निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मालमत्ता जाहीर केली.


यापुढे देखील सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्याना आळा घालणे तसेच प्रतिबंध होण्याचे दृष्टीकोनातुन अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच वरीलप्रमाणे नमुदहद्दपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्याचे हदपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र.११२ तसेच जवळील अथवा सबंधित पोलीस वाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क. ०२०-२६८६१२१४ यावर सपर्क साधुन गाहिती कळविण्याबाबत अवाहन करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow