शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ऑनलाईन इसमाची फसवणुक करणारे रशियन आरोपीस सायबर पोलीस ठाणेकडुन गोवा येथुन ताब्यात घेवुन गुन्हा उघड

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या इस्मा कंपनीची ७१,०५,००० रुपयांची फसवणूक करणाऱ्या रशियन नागरिकाला गोव्यातील सायबर स्टेशन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांकडे निर्देश करते.

TDNTDN
Dec 14, 2024 - 14:16
Dec 14, 2024 - 14:48
 0  5
शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ऑनलाईन इसमाची फसवणुक करणारे रशियन आरोपीस सायबर पोलीस ठाणेकडुन गोवा येथुन ताब्यात घेवुन गुन्हा उघड

वाकड येथे राहणारे इसमास इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात आलेल्या जाहीरातीवर क्लिक केले असता आरोपी यांनी त्यांना व्हॉटसअप ग्रुप L-2 Franklin Templeton Stock pull group चे ॲडमिन चेतन सेगल +919068095935, +917093972923, मिरा दत्त +918869085568 तसेच +918923521079, +919766344225, +919766344390, +919952055998 तसेच FT (India) Customer Care VIP 66, FTAM Customer service +919042217089, +919596740961 यांनी यावरुन संपर्क करुन Website fsknbf.com लिंक पाठवुन त्यांचे फेक वेबसाईटवरुन शेअर मार्केटचे स्टॉक आणि आयपीओ ट्रेडींग करण्यास सांगुन बैंक अकाऊंटवर एकूण ७१,०५,०००/- रुपये मरण्यास सांगुन फसवणुक केली म्हणून सायबर पोलीस ठाणे येथे गुरनं. ०७/२०२४ बी.एन.एस. कलम ३१८(४),३१९ (२) सह माहिती तत्रंज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६डी, प्रमाणे गुन्हा दाखल असुन सायबर पोलीस ठाणे मार्फत तपास चालु आहे.

 दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना आरोपी यांनी गुन्हयातील फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बैंक अकाऊंटवर घेतली असल्याने त्या अनुषंगाने तपास करीत असताना कॉसमॉस बैंक अकाऊंट नं. १३५१००१०७८१ मध्ये दि.२६/११/२०२४ रोजी २८ लाख रुपये आरोपी यांनी घेतले असल्याने त्याअनुषंगाने पोउनि, पोमण, पोउनि, कातकडे यांची पथकांनी तपास करता परकिय नागरीक टोनी व मार्क या नावाचे आरोपींनी सदर अकाऊंट गोवा येथे चालविले असल्याबाबत तांत्रिक व इतर माहीती प्राप्त झाली त्यावरुन तात्काळ वरिष्ठांचे परवानगीने मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे यांना तपासाबाबत सुचना दिल्या.

 त्याप्रमाणे सपोनि प्रविण स्वामी व पथकास गोवा येथे पाठविले असता त्यांनी गोवा येथे स्थानिक पोलीसांचे मदतीने कौशल्यपुर्वक तपास करुन मधलमज, मन्ड्रेम पेरनम, गोवा येथुन परकिय रशियन नागरीक Tony @ Anatoliy Mironov S/O Alexandrovich Mironov वय ३० वर्षे रा. 32, Leninskay, Orenburg City, Russia Passport No. 766146572 सध्या रा. घर नं. १३५ हनुमान मंदीराजवळ, मधलमज, मन्ड्रेम पेरनम, गोवा यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याने त्यास गोवा येथुन सायबर पोलीस ठाणे येथे आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा मार्क नावाचा साथीदार तसेच इसम नामे श्रेयश संजय माने वय-२२ वर्ष, रा. मुळ सागर कॉलनी शास्रीनगर, कोथरुड, पुणे यांचेसह करीत असल्याची कबुली दिली आहे.

काँग्रेसने देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान केला : रावसाहेब दानवे पाटील

त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने Tony @ Anatoliy Mironov S/O Alexandrovich Mironov व श्रेयश संजय माने यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांची गुन्हयाचे तपासकामी मा. न्यायालयात हजर करुन दि. १५/१२/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी नामे श्रेयश माने हा त्याचे मित्रांकडुन गेमींगच्या नावाने अकाऊंट व त्यांचे लिंक मोबाईल नंबर घेवून विमानाने गोवा येथे जावुन सदर रशियन आरोपी यांना पुरवुन त्यांचेसोबत सदरचे गुन्हे करीत होता. दाखल गुन्हयाचा पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाळे करीत आहे. तपासामध्ये अटक रशियन आरोपी हा मलेशिया मध्ये गेल्याबाबत तसेच त्याने गुन्हयातील अकाऊंट मलेशिया या देशात चालविले असल्याची माहीती मिळुन आली आहे. तसेच त्याचा गुजरात पोलीस त्यांचेकडील दाखल असलेले दोन गुन्हयामध्ये मागील दोन महीन्यापासुन शोध घेत असल्याची माहीती मिळाली आहे.

 सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयुक्त श्री. डॉ. शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. संदिप डोईफोडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे पोनि. रविकिरण नाळे, सपोनि. प्रविण स्वामी, पोउपनि सागर मोमण, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, दिपक भोसले, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, सौरम घाटे, दिपक माने, परशुराम चव्हाण, सुरज जाधव, सुरंजन चव्हाण, अनिकेत टेमगिरे, महेश मोटकर, सचिन घाडगे, निलेश देशमुख, दिपाली चव्हाण, मोनिका चित्तेवार, स्मिता पाटील, दिपाली टोपे सर्व नेमणुक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे बहाण्याने ऑनलाईन ७१,०५,०००/- रुपयांची आयटी मध्ये काम करणारे इसमाची फसवणुक करणारे रशियन आरोपीस पिंपरी चिंचवड सायबर पोलीसांकडून गोवा येथून ताब्यात घेवुन गुन्हा उघड वाकड येथे राहणारे इसमास इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना शेअर मार्केट संदर्भात आलेल्या जाहीरातीवर क्लिक केले असता आरोपी यांनी त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अॅड करून शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळवून देतो अमीष दाखवून त्यांना लिंकद्वारे त्यांचे केक वेबसाईटवरुन शेअर मार्केटचे स्टॉक आणि आयपीओ ट्रेडींग करण्यास सांगून बैंक अकाऊंटवर एकूण ७१,०५,०००/- रुपये भरण्यास सांगून फसवणुक केली. त्याबाबत तक्रारदार यांची सायबर पोलीस ठाणे येथे गुरनं. ०७/२०२४ बी. एन. एस. कलम ३१८ (४),३१९(२) सह माहिती तत्रंज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६डी, प्रमाणे गुन्हा दाखल असुन सायबर पोलीस ठाणे मार्फत तपास चालु आहे. गुन्हयातील फसवणुकीची रक्कम २८ लाख रुपये दि.२६/११/२०२४ रोजी कॉसमॉस बैंक अकाऊंट नं. १३५१००१०७८१ मध्ये जमा झाली असल्याने त्याबाबत सदर अकाऊंटभारकाचा शोध घेवून तपास केला असता त्याने सदर अकाऊंट त्याचे मित्राने मागितलेवरुन गेमिंगकरीता दिले असल्याची माहीती मिळाली त्यानंतर अभिया तपास व तांत्रिक तपास करता सदरचे अकाउंट हे गोवा येथे वापरले गेले असल्याची माहीती मिळाली व आरोपीने सदर अकाऊंटचे किट व लिंक मोबाईल गोवा येथे परकिय इसमास दिले असल्याबाबत माहीती मिळाली. सदर माहीतीचे आधारे तात्काळ सायबर सेल कडील सपोनि प्रविण स्वामी यांचे पथक गोवा येथे पाठविणेत आले.

सपोनि प्रविण स्वामी व पथकाने गोवा येथे तांत्रिक व कौशल्यपूर्वक तपास गोया येथून रशियन इसम Tony Anatolly Mironov S/O Alexandrovich Mironov Age-30 Orenburg City, Russia Passport No. 766146572 पास ताब्यात घेतले. RA- Leninskay, आरोपी नामे श्रेयश माने हा त्याचे मित्रांकडून गेमींगण्या नावाने अकाउंट व त्यांचे लिंक मोबाईल नंबर घेवुन विमानाने गोवा येथे जावून सदर रशियन आरोपी यांना पुरवून त्यांचेसोबत सदरचे गुन्हे करीत होता. गुन्हयासाठी वापरलेले बैंक अकाऊंटमधून परदेशात दुबई इत्यादी ठिकाणी रक्कम वर्ग केल्याचे दिसून आले आहे. सदर आरोपी सुरुवातीला मोबाईलचे पासवर्ड किया इतर कोणतीही माहीती देत नव्हता त्यामुळे त्यास ताम्यात घेवून सायबर पोलीस ठाणे येथे आणून व्यावेकडे अधिक कौशल्यपूर्वक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचा परकिय साथीदार मार्क वाचेसह पुण्यातील इसम श्रेयश संजय माने वय-२२ वर्ष व्यवगाय शिक्षण रा. मुळ सागर कॉलनी शाश्रीनगर, कोथरुड, पुर्ण याचेकडून अकाऊंट प्रापा करून गुन्हा करीत असल्याची कबुली दिली आहे.

सदर गुन्हयात आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यावरुन नमुद रशियन आरोपी Tony Anatoliy Mironov व त्याचा नमुद पुष्यातील साथीदार श्रेयश माने यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये अटक रशियन आरोपी हा मलेशिया मध्ये गेल्याबाबत तसेच त्याने गुन्हयातील अकाऊंट मलेशिया या देशात चालविले असल्याची माहीती मिळून आली आहे. तसेच त्याचा गुजरात पोलीस त्यांचेकडील दाखल असलेले दोन गुन्हयामध्ये मागील दोन महीन्यापासून शोध घेत असल्याची माहीती मिळाली आहे. आरोपी याचे मोबाईलमध्ये इतर बरेच बैंक अकाऊंट मिळून आले असुन त्याबाबत, त्याचे साथीदार मार्क, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तप्पास, फसवणुकीची रक्कम पुढे कोठे वर्ग करीत आहे त्याबाबतचा तपास, त्यांचे क्रिप्टो जायडीची माहीती घेणेकामी त्यांना न्यायालयात हजर करून त्यांची दि. १५/१२/२०२४ पर्यंत पोलीस कोटडी रिमांड घेण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास सायबर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. रविकिरण नाले हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow