दरोडा व वाहन चोरी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर
डांबून ठेवलेल्या तामिळनाडू येथील एका युवकाची सुरक्षित सुटका करून ६ आरोपीत इसमाना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
एक इसम वय 35 रा.तिरुवन्नामलाई , तामिळनाडू हा दिनांक 06/01/2025 रोजी तमिळनाडू येथून मुंबई करता निघाला होता.त्यानंतर दिनांक 09/01/2025 रोजी सकाळी 09 ते 10 च्या दरम्यान पीडित इसम याने त्याचे फोन वरून त्याचे नातेवाईकांना तिरुवन्नामलाई,तामिळनाडू येथे फोन करून कळवले की त्याला काही लोकांनी किडनॅप केलेले आहे. आणि त्याला हॉटेलवर नेऊन फार मारहाण करत आहेत,पैशाची मागणी करत आहेत व ते पुणे शहरात आहेत. याबाबत मा पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांनी दुपारी 15/00 वा. पासून तांत्रिक माहितीच्या आधारे सतत फुरसुंगी, कुंजीरवाडी ,शेवाळवाडी, त्यानंतर शिक्रापूर नगर रोड या परिसरात तपास करून यातील पीडित इसम यास सुरक्षितरित्या दि. 09/01/2025 रोजी रात्री मुक्तता करून खालील नमूद आरोपी यांना ताब्यात घेतलेले.
1. मोहम्मद फर्मान मेहेरबान वय 27 वर्ष रा. नरूलापूर तहसील बिजनोर उत्तर प्रदेश
2. अर्जुन कुमार शिवकुमार वय 28 वर्ष रा. वरील प्रमाणे
3. देवेंद्र सुनील अलभर वय 25 वर्ष रा.देवपैठण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
4. अंकित अर्जुन अडागळे वय 25 वर्ष रा.पवई आयआयटी मार्केट मुंबई
5. अविनाश दत्तात्रय कदम वय 43 वर्ष रा.शिक्रापूर मलटण फाटा शिक्रापूर
6. प्रियांक राणा देवेंद्र राणा वय 33 वर्ष रा. 401/1 न्यू आदर्श नगर रुडकी जिल्हा हरिद्वार राज्य उत्तराखंड
हकिकत :- यांनी दि. ०८/०१/२०२५ व ०९/०१/२०२५ रोजी फिर्यादी याना आणून त्यांचे बिन्नास प्रा.ली कंपनीचे मॅनेजर यांचे मधे झालेल्या ३००० यू.एस.डॉलर DT करंसी खरेदीचे आर्थिक व्यवहाराचे कारणावरून फिर्यादी याना पिंगरा हॉटेल सोलापूर रोड हडपसर पुणे येथे हाताने मारहाण करून धमकी देऊन बेकायदेशीर डांबून ठेवले .
आशी हकिकत समजल्याने फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून हडपसर पोलीस स्टेशन येथे गु. र.क्र. ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२७(७),३५१ (२),११५(२),३(५) अन्वये कारवाईसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शना प्रमाणे हडपसर पोलीस स्टेशन येथे नमूद पिडीत व आरोपीस हजर केले आहेत .पुढील तपास हडपसर पो ठाणे करत आहे .
सदर ची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त श्री.रंजनकुमार शर्मा , मा.अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.शैलेश बलकवडे, मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री.निखिल पिंगळे, मा.सहा. पोलीस आयुक्त गुन्हे (2) श्री.राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शना खाली पो.निरी विजय कुंभार (AEC-2), पो.निरी संदिपान पवार (ADS-2), पो.निरी. युवराज हांडे (Unit 5) , पो.निरी.पठाण (Unit-6), सहा पो.निरी.सी.बी.बेरड, ADS-2 तसेच ADS-2, AEC-2, UNIT 5,व 6 चे स्टाफ यांनी केली आहे.
What's Your Reaction?