सुट्टीच्या काळात ट्रॅफिक जामचे संकट
खंडाळा घाटात 10-12 किलोमीटर लांब रांगा प्रवाशांना त्रास
नाताळ आणि नववर्षाच्या सुट्ट्यांच्या धामधुमीत महाराष्ट्रातील महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. बुधवारी सकाळपासून मुंबईहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाटात 10 ते 12 किलोमीटर लांब रांगा लागल्या असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांना अनेक पावले उचलावी लागली आहेत.
जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महामार्ग पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने खंडाळा बोगद्याजवळ अडवून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सहा मार्गिका खुल्या केल्या. मात्र, हे उपायही अपुरे ठरले. अमृतांजन पुलापासून आंदा पॉइंट आणि खालापूर टोल नाका परिसरात वाहने थांबल्यामुळे प्रवाशांना एक ते दीड तास अवघे सात ते आठ किलोमीटरचे अंतर कापावे लागले.
अटलजींच्या विचारांचे पालन होणे ही खरी आदरांजली - शंकर जगताप
अशीच परिस्थिती कोकणात येणाऱ्या पर्यटकांमुळे गोवा महामार्गावर पाहायला मिळाली. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यासोबतच पर्यटकांनी कोणत्याही कोंडीत अडकू नये यासाठी त्यांनी वेळेचे आधीच नियोजन करावे, अशी सूचना केली.
महाबळेश्वर, पाचगणी आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी दिसून आली, त्यामुळे विशेषत: कुटुंबीय आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अशा परिस्थितीत योग्य वेळी प्रवास करणे आणि लेनची शिस्त पाळणे आवश्यक आहे जेणेकरून सुट्टीचा आनंद कोणत्याही अडथळ्याशिवाय घेता येईल.
What's Your Reaction?