वेतन वाढकरारमुळे माथाडी कामगारांना आर्थिक मदत होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल.. कामगार नेते इरफान सय्यद
माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार..;शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार...
कामगार कपात आणि वेतन कपातीच्या निर्णयामुळे कामगार देशोधडीला लागत आहेत. तशातच व्यवस्थापन आणि कामगार यात समन्वय साधून वेतन करार करून माथाडी कामगारांना आणि व्यवस्थापन यामध्ये मार्ग काढून त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्नही महाराष्ट्र मजदुर संघटना करीत आहे. शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदुर संघटना आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सल्लागार समिती सदस्य, तथा शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या प्रयत्नातून पिंपरी चिंचवड शहरातील एका नामंकित कंपनीतील युनिट्समध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांना 5250 रुपयांची घसघशीत पगारवाढ लागू करण्यात आली. ही पगारवाढ जुलै 2024 या महिन्याच्या पगारामध्ये समाविष्ट देखील करण्यात आली आहे.
इरफान भाई सय्यद म्हणाले की, कामगारांना कंपनी व्यवस्थापनाचे नेहमीच सहकार्य आहेच. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमधील चर्चेने विषय सोडविण्याचे काम संघटना करीत असते . यापुढील काळातही कामगार व प्रशासनाने बरोबर राहून कंपनीचे व कामगारांचे हित जपावे. महाराष्ट्र मजूर संघटना ही हिंदु हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार व प्रेरणा घेऊन निर्माण झालेली संघटना आहे. कामगार हिताचे बाळकडू प्यायलेली ही संघटना केवळ कामगारांचे हित जपण्यातच धन्यता मानते. त्यामुळे कष्टकरी कामगार हे संघटनेकडे आपलेपणाने पाहतात. आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी सदैव झटत राहू आणि सर्वच स्तरातील श्रमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत राहू. भरघोस पगारवाढ मिळाल्याने कामगारांना शुभेच्छा.
कामगारांनी आपली एकजूट अशीच कायम ठेवावी.
What's Your Reaction?