राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा संपन्न झाला.
राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनामध्ये अनेक मानके तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वेबसाइटवर माहिती न देणाऱ्या शाळांविरुद्ध सीबीएसईचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यासोबतची आपली नाळ अधोरेखित करत या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार असे आश्वस्त केले. यासोबतच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असेही श्री. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह माजी मंत्री शोभाताई फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?