सिंहगड रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
अवजड वाहनांच्या वाहतुकीवर नवीन निर्बंध, स्थानिक नागरिकांच्या तक्रारींनंतर प्रशासनाचा निर्णय
सिंहगड रोड वाहतुक विभागाचे हद्दीमधील भुमकर चौक अंडरपास, न-हे धायरीगाव, मानाजीनगर हा भाग नव्याने पुणे महानगरपालिकेच्या स्थलसीमेमध्ये सामिल करण्यात आल्याने सदर भागात रहिवासी भागात वाढ झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरे, सोसायट्यांची बांधकामे चालू आहेत. न-हे परिसरात इंडस्ट्रीयल एरिया असल्याने दिवसेंरात्र सदर भागात जाणारी जड वाहने ही भुमकर चौकातुनच ये-जा करत असतात. जड वाहने व स्थानिक नागरिक दळवळणाकरीता भुमकर चौक ते कंट्रोल चौक हाच रस्ता प्रामुख्याने वापरतात. सदर भागात शाळा, कॉलेज, हॉस्पीटल असल्याने पिक हावर्समध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. भुमकर चौक ते कंट्रोल चौक हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहतूकीमुळे सदर भागात वारंवर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असुन सदरबाबत वारंवार तक्रारी अर्ज, वृत्तपत्रामधुन प्रसिद्धी होत आहे त्याकरिता जनतेस पोहचणारा धोका, अडथळा आणि गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र. एम. व्ही. ए. ०१९६/८७१/सीआर- ३७/टीआरए २, दिनांक २७/०९/१९९६ चे नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६(४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन मी अमोल झेंडे, पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, पुणे शहर, सिंहगड रोडवरील जड वाहनांचे वाहतूकीसंदर्भात खालीलप्रमाणे नव्याने आदेश निर्गमित करीत आहे. > सिंहगड रोडवरील भुमकर चौक अंडरपास न-हे गांव ते श्री कंट्रोल चौक नन्हे गांव पर्यत पिक अवर्स मध्ये (सकाळी ७/०० वा ते ११/०० वाजेपर्यत व सांयकाळी १७/०० वा ते रात्री २१/०० वाजेपर्यत नमुद ठिकाणी / रस्त्यावर, तसेच या मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या इतर अंतर्गत रस्त्यांवर नमुद वेळेत सर्व प्रकारच्या जड, अवजड, मंदगती वाहनांची वाहतूक तसेच पार्किंग करणेस बंदी करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका, इ. खेरीज करून)
राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले व्रतस्थ नेतृत्व म्हणजे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार!
१. सहा. पोलीस आयुक्त, वाहतूक १,२,३,४पुणे शहर. २. पोलीस निरिक्षक, प्रेसरूम, पोलीस आयुक्त कार्यालय, पुणे २/- सदर प्रेस नोटच्या प्रति पत्रकारांना देवून, सदरची बातमी वर्तमानपत्रातून प्रसिध्दकरण्याची विनंती करावी. ३. प्रभारी अधिकारी, सर्व वाहतुक विभाग, पुणे शहर. २/- सदरबाबत म.न.पा. पुणे यांचेकडून वरील प्रमाणेफलक बसवुन घेवुन ०७ दिवसांत पुर्तता अहवाल इकडील कार्यालयास सादर करावा. ४. पोलीस उप निरीक्षक, मल्टीमिडीया कक्ष, वाहतूक शाखा, पुणे शहर २/- सदरची प्रेसनोट कोणत्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाली आहे, त्या वर्तमानपत्राचे कात्रणाची छायांकित प्रत इकडील कार्यालयात सादर करावी. सदर प्रेसनोट ही पुणे वाहतुक पोलीस वेबसाईट व फेसबुकवर / ट्विटरवर अपलोड करावी. ५. पोलीस निरीक्षक, नियोजन, वाहतूक शाखा, पुणे शहर २/- संबंधित विभागांचे प्रभारी अधिकारी यांचेकडून पुर्तता अहवाल प्राप्त करुन घेऊन सादर करावा. २/-सदर ठिकाणी वरील प्रमाणे फलक बसविणेबाबतची कार्यवाही होणेस विनंती आहे. ६. मा. सहाय्यक अभियंता (ट्रॅफिक प्लॅनिंग), म.न.पा. पुणे
What's Your Reaction?