शहराध्यक्ष पदी अतुल क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदी औदुंबर पाडुळे यांची वर्णी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहराची नविन कार्यकारिणी जाहीर

Dec 29, 2024 - 08:13
Dec 29, 2024 - 08:14
 0  18
शहराध्यक्ष पदी अतुल क्षीरसागर तर उपाध्यक्ष पदी औदुंबर पाडुळे यांची वर्णी

पुणे (पिंपरी ):- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पिंपरी चिंचवड शहराची नविन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी दै. लोकमतचे धडाडीचे पत्रकार अतुल क्षीरसागर यांची शहराध्यक्ष पदी तर औदुंबर पाडुळे यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली. 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची संघाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मासाळ यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवडचे मावळते अध्यक्ष पराग कुंकूलोळ यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी 2025 वर्षाची नविन पद नियुक्ती करण्यात आली.

आयटीतील नेरेच्या सरपंचाला ग्रामसभेत जीवे मारण्याची धमकी

यावेळी संघाचे नितीन शिंदे, बलभीम भोसले, महादेव मासाळ, मिलिंद संधान, संदिप सोनार, अतुल क्षीरसागर, योगेश गाडगे, संतोष चव्हाण, रामहरी केदार, औदुंबर पाडुळे तर ऑनलाईन द्वारे पराग कुंकूलोळ, जमीर सय्यद, सागर झगडे, हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते नविन कार्यकारिणीला संमती देण्यात आली.

नवनियुक्त कार्यकारिणी खालीलप्रमाणे

अध्यक्ष : अतुल क्षीरसागर
उपाध्यक्ष : औदुंबर पाडुळे
सचिव : जमीर सय्यद
सह. सचिव. : संतोष चव्हाण
खजिनदार : मिलिंद संधान
कार्याध्यक्ष : योगेश रामभाऊ गाडगे
प्रसिद्धी प्रमुख :  सागर झगडे
संघटक : संदिप सोनार
संपर्क प्रमुख : रामहरी केदार

कार्यकारिणी सदस्य प्रमुख
बलभीम भोसले

चिंचवड विधानसभा अध्यक्ष बेलाजी पात्रे
पिंपरी विधानसभा अध्यक्ष विकास शिंदे
भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रमोद सस्ते

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow