बीड, परभणीतील घटना गंभीर; सरकार सविस्तर चर्चेसाठी तयार आहे

"संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

TDNTDN
Dec 16, 2024 - 14:00
Dec 16, 2024 - 14:03
 0  4
बीड, परभणीतील घटना गंभीर; सरकार सविस्तर चर्चेसाठी तयार आहे

नागपूर, 16 डिसेंबर : बीड आणि परभणी येथील दोन्ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. या घटनांवर सविस्तर चर्चेसाठी सरकार तयार असून राज्यघटनेचा अवमान कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे ते म्हणाले.

पुष्पा 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10: अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर, 'पुष्पा 2' ने 71 टक्के कमाई केली, 'जवान' आणि 'RRR'ला मागे टाकले

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सभागृहात आवश्यक ती चर्चा झाली पाहिजे." संविधानाचा अपमान करणारी व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी विरोधकांनी राजकारणाच्या वरती उठून विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी अतुल सुभाषची पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावादरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow