बाणेरमध्ये फॅमिली रन 3.0 मॅरेथॉनचे आयोजन
बाणेर (पुणे) – जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशन आयोजित फॅमिली रन ३.० मॅरेथॉनचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण करणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या मॅरेथॉनमध्ये बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुस, म्हाळुंगे, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी व परिसरातील 3000 हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. सर्व सहभागींना त्यांच्या परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी पदके, प्रमाणपत्रे आणि टी-शर्ट देण्यात आले.
संगीत मानापमान अभिजात मराठी कला, संगीताला रिइन्व्हेंट करणारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमादरम्यान शरद पवार म्हणाले, "जयेश हा तरुण कार्यकर्ता आहे जो आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने चांगले काम करत आहे." या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या लोकांचे त्यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जयेश मुरकुटे यांनी शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, माझ्यासारखे तरुण जेव्हा त्यांचे कार्य पाहतात तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळते.
डॉ. चंद्रशेखर कुमार यांनी संविधान निर्माण योजनेची पाहणी केली
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांसह स्थानिक नागरिक व स्पर्धकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसुंधरा अभियानाला शुभेच्छा देताना श्री.पवार यांनी कुस्तीपटू विराज रानवडे आणि इस्रोच्या शास्त्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या अजय भुजबळ यांचाही गौरव केला.
हा कार्यक्रम केवळ आरोग्य आणि तंदुरुस्तीबद्दल जागरुकता पसरवण्याचे माध्यम बनले नाही तर स्थानिक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनले.
What's Your Reaction?