पिंपरी चिंचवडमध्ये पेन्शनर्स दिन साजरा करण्यात आला

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हक्क आणि कल्याण यावर चर्चा

TDNTDN
Dec 17, 2024 - 14:53
Dec 17, 2024 - 14:54
 0  7
पिंपरी चिंचवडमध्ये पेन्शनर्स दिन साजरा करण्यात आला

पिंपरी दि.१७ डिसेंबर २०२४ :- महापालिकेने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, पोस्ट, पोलीस संघटना, जिल्हा परिषद, बँक, महापालिका आदी सेवानिवृत्त संघटनांचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी, समस्या व मागण्या यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, असे मत अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी व्यक्त करून पेन्शनर्स डे चे औचित्य साधून उपस्थित सेवानिवृत्तांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी तसेच २०२५ नवीन वर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज सेवा निवृत्ती धारक दिन अर्थात पेन्शनर्स डे साजरा करण्यात आला. संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थित सेवा निवृत्ती धारकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगण येथे १३वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन संपन्न

१७ डिसेंबर १६८२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त अधिकारी आणि पेन्शनधारकांना सन्मान आणि शालीनतेची हमी देणारा ऐतिहासिक निर्णय दिला होता. या निकालाद्वारे सेवा निवृत्तांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी वर्षानुवर्षे लढा देणारे दिवंगत डी.एस. नाकारा यांचे स्मरण व त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त  करण्यासाठी आपल्या देशात या दिवशी ‘पेन्शनर्स डे’ सर्वत्र साजरा केला जातो.

या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,  महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन.डी. मारणे, पुणे जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष वसंतराव वाबळे, सरचिटणीस लक्ष्मण टेंभे, वर्धा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे संघटक विलास मांडवकर, पिंपरी चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषदेचे चंद्रकांत झगडे, गणेश विपट, दीपक रांगणेकर, श्रीकांत मोने, श्रीराम  परबत , शांताराम वाळूंज, अलमगीर नाईकवडी, प्रल्हाद गिरीगोसावी, वसंत कदम, यशवंत चासकर, नामदेव तारू, शहाजी माळी, हिंदुराव माळी, विजया जीवतोडे, कुमुदिनी घोडके, मंगला नायडू, नामदेव गारू, छबू लांडगे, बी.टी. बोऱ्हाडे, भाऊसाहेब उमरे, गेंगजे, विजय सुपेकर, जावळे, विजय घावटे, नारायण फुगे यांच्यासह केंद्र शासन, राज्य शासन, रेल्वे, पोस्ट, पोलीस संघटना, जिल्हा परिषद, बँक, महापालिका आदी निवृत्त संघटनांचे सभासद उपस्थित होते.

महिलांच्या स्वावलंबनासाठी महापालिकेने सुरु केले अत्याधुनिक शिलाई केंद्र

एन.डी.मारणे म्हणाले, सेवानिवृत्तांच्या अडी- अडचणी सोडविण्यासाठी तसेच मागण्यांसाठी सर्व सभासदांनी  संघटित होणे गरजेचे आहे. पेन्शनर्सने सेवानिवृत्तांच्या समस्या, शासनाचे पेन्शनविषयक धोरण यासारख्या विषयांवर स्वतःच्या हक्कासाठी लढले पाहिजे. पेन्शनर्सनी समाजासाठी आयुष्य सार्थकी लावावे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून कार्यरत रहावे यासाठी चांगले मित्र जपावेत. आवडत्या ठिकाणी भटकंती करावी. चित्रकला,हस्तकला, गायन, वादन यांसारखे छंद जोपासावे. निसर्गाच्या सानिध्यात वेळ व्यतीत करावा. नियमित आसने,योगा यासारखा व्यायाम करावा, तसेच मनमोकळे जीवन जगावे. कुटुंबासोबत वेळ घालवा असे मार्गदर्शनही  मारणे यांनी केले.

वसंतराव वाबळे यांनी  पेन्शनर्सच्या आयुष्यात येणाऱ्या अडी- अडचणींमध्ये महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन मदत करते. पेन्शनर्सची  देखील काही कर्तव्य आणि जबाबदाऱ्या असून त्या त्यांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगून सर्वांना  निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा  दिल्या.   

लक्ष्मण टेंभे म्हणाले, निवृत्ती वेतनधारकांच्या वयाच्या ८० वर्षानंतर वाढीव पेन्शन व सवलत   मिळावी आदी मागण्यांसाठी संघर्ष चालू असून यासाठी सर्व निवृत्त वेतनधारकांनी संघटीत व्हावे.

अरुण बागडे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका सेवा निवृत्त वेतनधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोलाचे सहकार्य करते.  महापालिकेने पेन्शनर्स डे कार्यक्रमासाठी जास्त निधीची तरतूद करावी. निवृत्त वेतनधारकांच्या सर्व संघटनानी एकत्र येऊन मागण्यांसाठी लढा देणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow