तुमच्या व्यवसायाला चालना देणाऱ्या नवीन डिजिटल मार्केटिंग धोरणे
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमचे विपणन प्रभावी कसे करायचे ते शिका
पिंपरी, दि. २४ डिसेंबर २०२४ : चऱ्होली येथील स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसविणे तसेच बोपखेल आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत स्मशानभूमीमध्ये पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवण्याच्या विषयासह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
शहरातील स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच झाडे वाचवण्यासाठी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनीचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यानुषंगाने चऱ्होली येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
स्मशानभूमीत पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल येथील स्मशानभूमीत आणि ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील स्मशानभूमीत पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली. शहरातील स्मशानभूमीमध्ये टप्प्याटप्प्याने विद्युतदाहिनी बसविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या १६ शाळांमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यास मान्यता
महापालिकेच्या १०५ शाळांपैकी मे. आसरा फाउंडेशन या संस्थेला झिरो वेस्ट (शून्य कचरा) शाळा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील ८ शाळा प्रायोगिक तत्वावर देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ८ शाळा, दुसऱ्या टप्प्यात १६ शाळा, तिसऱ्या टप्प्यात १६ शाळा , चौथ्या टप्प्यात १६ शाळा यानुसार १०५ शाळांपैकी ५६ शाळा झिरो वेस्ट (शून्य कचरा) करण्यात आला आहेत. यापुढे शून्य कचरा प्रकल्प राबविण्यासाठी पुढील १६ शाळांची निवड करण्यात आली असून यामध्ये अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील विद्यानिकेतन मुलांची व मुलींची शाळा, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील काळेवाडी मुलांची व मुलींची शाळा, क क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खराळवाडी येथील उर्दू शाळा, जाधववाडी येथील उर्दू प्राथमिक शाळा, ड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कस्पटे वस्ती शाळा, ई क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील भोसरी येथील मुलांची व मुलींची शाळा, फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील निगडी येथील मुलांची व मुलींची शाळा, ग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील खिवंसरा पाटील मुलींची शाळा, कर्मवीर भाऊराव पाटील शाळा, थेरगाव उर्दू शाळा, ह क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील छत्रपती शाहू महाराज प्राथमिक शाळा, संत तुकाराम नगर प्राथमिक शाळा या शाळांचा समावेश असून या शाळेमध्ये झिरो वेस्ट प्रकल्प राबविण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
बैठकीत मंजूर झालेले विषय
शहरातील विविध परिसरातील रस्त्यांची आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करणे, शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन टाकण्यासाठी अडथळा येणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्च व लघुदाब वीजवाहिन्या स्थलांतरित करणे , विविध प्रभागातील स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे आदी विषयांच्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.
What's Your Reaction?