ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन गृहनिर्माण धोरणाची घोषणा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'सर्वांसाठी घरे' योजनेअंतर्गत विशेष धोरणाचे आश्वासन दिले
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी महिनाभरात केली जाणार आहे. 'सर्वांसाठी घरे' या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत परवडणारी, पर्यावरणपूरक आणि शाश्वत घरे निर्माण करणे हा या धोरणाचा उद्देश आहे.
तुरुंगात ई-मुलाखत: कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी नवीन आशा
या घोषणेदरम्यान शिंदे म्हणाले की, "ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आम्ही स्वतंत्र धोरण तयार करत आहोत, ज्यामुळे त्यांना घरांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील." हे धोरण केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठीच नाही, तर विद्यार्थी, नोकरदार महिला आणि कामगारांसाठीही विविध निवासी पर्याय निर्माण करेल.
हे विशेष धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, असेही शिंदे म्हणाले. नवीन धोरणात वसतिगृहे, भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण संकुल आणि पर्यावरणपूरक गृहनिर्माण यावर भर दिला जाईल.
वाल्मिक कराड प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले प्रश्न
याशिवाय मुंबईतील झोपडपट्ट्या मुक्त करण्यासाठी रखडलेले प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. म्हाडा आणि इतर गृहनिर्माण योजनांचा लाभ नागरिकांना सहज मिळू शकेल, याची दक्षता घेण्याचे निर्देश शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या नवीन गृहनिर्माण धोरणाचा फायदा केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच होणार नाही, तर एकूणच शहरातील घरांचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.
What's Your Reaction?