सराईत वाहनचोरटगास न पाहिजे आरोपीस अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून तिन दुचाकी वाहने केली जप्त.
दि.१३/१२/२०२४ रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३२४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. मनोजकुमार लोंढे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक अशोक येवले, तपास पथकातील पोलीस अमंलदार यांनी गुन्हयाचे घटना ठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार ज्योतिष काळे व प्रणय पाटील यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी यश ज्ञानेश्वर खलसे वय १९ वर्षे रा. आगम मंदिराजवळ, पाण्याचे टाकीशेजारी कात्रज, पुणे. यास अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले.
आता सोसायटी अध्यक्षांकडे पाठविली जाणार सोसायटी मधील थकबाकीदारांची यादी !
सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.३२४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं.२८७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) ३) कामशेत पो. ठाणे गुन्हा रजि.नं.१९९/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) अशी एकूण १,५०,०००/-कि. रू.ची एक यामाहा एफझेड, होंडा शाईन व अॅक्टीव्हा मोपेड अशा तिन मोटर सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत तसेच देहूरोड पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५२८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३),३३१ (४),३ (५) या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन झालेले आहे. सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे, श्री. मनोजकुमार लोंढे, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक अशोक येवले व पोलीस अंमलदार संजय गायकवाड, संतोष जाधव, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, अजय कामठे, सुमित ताकपेरे यांनी केली आहे.
What's Your Reaction?