मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

TDNTDN
Dec 12, 2024 - 08:17
 0  8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची सदिच्छा भेट

नवी दिल्ली

:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. आज दिल्लीत आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे दैवत

असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन त्यांचा आदर-सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे थेट उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या निवासस्थानी गेले. तेथे त्यांना विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती देऊन उपराष्ट्रपती महोदयांचा सत्कार केला आणि त्यांचे आशिर्वाद घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow