पर्पल जल्लोष'मध्ये खवय्यांसाठी मेजवानी

एकाच छताखाली वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव घेण्याची मिळतेय संधी

TDNTDN
Jan 19, 2025 - 08:15
 0  3
पर्पल जल्लोष'मध्ये खवय्यांसाठी मेजवानी

गरमा गरम पिठलं भाकरी... खास हैदराबादची बिर्याणी.... गुजराती खाकरा...साजूक तुपातील पुरणपोळी...उकडीचे मोदक... अशा विविध अस्सल खाद्यपदार्थांची मेजवानी 'पर्पल जल्लोष'मध्ये खवय्यांनी अनुभवली. निमित्त आहे खाद्य महोत्सवाचे!

पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी १७ जानेवारी ते १९  जानेवारी २०२५  याकाळात ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे सुरू असलेल्या या कार्यक्रमामध्ये दिव्यांग बांधव, दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यांचे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. येथे विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे.

पर्पल जल्लोष महोत्सवात विविध कार्यक्रम होत असून, या सर्व कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यातच येथे आयोजित खाद्य महोत्सवाकडे पिंपरी चिंचवडकरांची पाऊले वळत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी एकाच छताखाली मिळत असल्याने खाद्य महोत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
......

पर्पल जल्लोष कार्यक्रमासाठी आम्ही हैदराबाद येथून आलेलो आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग बांधवांसाठी एवढा मोठा उपक्रम राबवते, हे पाहून समाधान वाटले. येथील सुंदर नियोजन खूपच छान आहे. येथील नागरिकांचा खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- गजम नरसिंहराव, स्टॉल धारक, हैदराबाद

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow