डॉ. मनमोहन सिंग यांचा मृत्यू: भारताच्या आर्थिक स्तंभाचा अंत
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांनी श्रद्धांजली वाहिली, देशात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली, ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल देखील उपस्थित होते.
डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या धाडसी आर्थिक सुधारणांसाठी ओळखले जातात, ज्यामुळे भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान मिळाले. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, "त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांसाठी मोठी हानी झाली आहे. देशाची सेवा आणि त्यांच्या निर्दोष राजकीय कारकिर्दीसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील."
त्यांच्या पार्थिवावर आज (२७ डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय शोक पाळण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मनमोहन सिंग यांचा जन्म 1932 मध्ये पंजाब, पाकिस्तानमध्ये झाला. 2004 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. ते दोनदा पंतप्रधान होते आणि त्यांच्या धोरणांचा लाखो लोकांच्या जीवनावर परिणाम झाला.
त्यांच्या 'चेजिंग इंडिया' या पुस्तकात त्यांनी त्यांचे जीवनातील अनुभव सांगितले होते आणि "मी अपघाती पंतप्रधान नाही, मी अर्थमंत्री देखील आहे." त्यांचा वारसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील.
What's Your Reaction?