गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली; घटना दुर्दैवी

दुर्घटनाग्रस्तांना योग्य मदत करण्यात येईल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

TDNTDN
Dec 19, 2024 - 08:43
Dec 19, 2024 - 08:43
 0  4
गेट वे हून एलिफंटाकडे जाताना बोट उलटली; घटना दुर्दैवी

नागपूर : मुंबईतील गेटवेवरून एलिफंटा येथे जात असताना बोट उलटल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अपघातात सुमारे सात ते आठ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून पीडितांना योग्य ती मदत देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
वेळीच बचावकार्य सुरू केल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचू शकले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले, "प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जात असून, बेपत्ता लोकांच्या शोधात कोणतीही कसर सोडू नये, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत."

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारेवाडी, माण चे उत्तुंग यश!


या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. नुकसान भरपाईसोबतच वैद्यकीय मदतही पुरविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


या अपघातामुळे जलवाहतुकीच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे अपघात रोखण्यासाठी सुरक्षेच्या निकषांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचे अभिनंदन


या घटनेमुळे स्थानिक रहिवासी आणि प्रवासी अत्यंत चिंतेत असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत आहेत. सर्वांचे लक्ष आता बचाव कार्याकडे लागले आहे, तर सरकारने पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow