शाहपूरमध्ये सराफा दुकानावर गोळीबार झाल्याने दहशत
महालक्ष्मी ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर अज्ञातांकडून हल्ला, गंभीर जखमी
शहापूर : महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानात काम करणारे दिनेश चौधरी हे दुकान बंद करून बाहेर जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पंडित नाका परिसरात रात्री 9.30 च्या सुमारास हा हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला आणि लगेचच तेथून पळ काढला.
नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना निलंबित
या घटनेत दिनेश चौधरी हा गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि इतर पोलिस घटनास्थळी पोहोचले, तर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
पुण्यात गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पकडला
गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळता याव्यात यासाठी सुरक्षा वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तर निर्माण झाले आहेच शिवाय परिसराच्या एकूणच सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेशी संबंधित कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी सर्व नागरिकांना केले आहे.
What's Your Reaction?