महाराष्ट्रातील पत्रकारितेचा सन्मान सोहळा
"आचार्य बाळशास्त्री जांभेकर - पत्रकार भूषण" पुरस्कार सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई - पिंपरी चिंचवड शहर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने "आचार्य बाळशास्त्री जांभेकर - पत्रकार भूषण" पुरस्कार सोहळा २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी येथे हा कार्यक्रम होणार असून प्रथम सत्रात महाराष्ट्र (माध्यमांची) दशा आणि दिशा हा परिसंवादाचा कार्यक्रम होणार असून संवादक -किरण माने, सरिता कौशिक संपादिका एबीपी माझा, अमित मोडक आऊटपुट एडिटर न्यूज 18 लोकमत, अभिजीत कांबळे संपादक, बी. बी. सी. मराठी, सचिन जवळकोटे कार्यकारी संपादक, लोकमत, कमलेश सुतार संपादक झी 24 तास, राजू परुळेकर राजकीय विश्लेषक सहभागी होणार आहेत.
द्वितीय सत्रात महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत तसेच उद्घाटक माजी आमदार विलास लांडे,
प्रमुख पाहुणे म्हणून मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, संजय भोकरे (संघटक, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई)
आकाश फुंडकर कामगार मंत्री, वसंत मुंडे, (प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई) आमदार अमित गोरखे, उद्योजक श्रीचंद आसवानी, संजय कलाटे, वैभव विधाटे संचालक, एम्ब्रॉसिया गॅलेक्सी, ज्ञानेश्वर तापकीर संचालक, योगिराज नागरी स. पतसंस्था म. बाणेर, यशवंत भोसले अध्यक्ष राष्ट्रीय श्रमिक आघाडी, विश्वासराव आरोटे सरचिटणीस हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इरफानभाई सय्यद उपनेते शिवसेना हे आहेत.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मुले परिसरात प्रेरणास्त्रोत होत आहेत.
तर यावेळी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच गाव, शहरांमध्ये सामाजिक पत्रकारितेच्या माध्यमातून पोहोचणाऱ्या पत्रकार बांधवांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .
यामध्ये पंकज इंगोले, कॅलिडस मीडिया पुणे, प्रताप नाईक झी२४ तास कोल्हापूर, उमेश अलोने एबीपी माझा अकोला, सुनील कच्छवे दैनिक पुढारी छत्रपती संभाजीनगर, दत्ता मर्ढेकर दैनिक ऐक्य वाई, गणेश यादव लोकसत्ता पिंपरी चिंचवड, लक्ष्मण घाटोळ न्यूज १८ लोकमत नाशिक, चंद्रशेखर भांगे लोकशाही पुणे, सोनाली शिंदे एबीपी माझा मुंबई, संतोष मिश्रा दैनिक भास्कर पिंपरी चिंचवड, विकास शिंदे सिविक मिरर पिंपरी चिंचवड, नितेश राऊत बीबीसी मराठी अमरावती, निलेश झालटे मुंबई तक मुंबई, गोपाळ मोटघरे साम मराठी पिंपरी चिंचवड, शितल मुंडे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मुंबई, भास्कर मेहरे न्यूज १८ लोकमत यवतमाळ, कुलदीप माने एबीपी माझा सांगली, राजेंद्र कोरके दिव्य गर्जना पंढरपूर, बेलाजी पात्रे दैनिक सकाळ पिंपरी चिंचवड, समीर मगरे तरुण भारत यवतमाळ, अतुल मारवाडी दैनिक लोकमत पिंपरी चिंचवड, विशाल विकारी मावळमाझा लोणावळा, शेखर पाटील दैनिक पुढारी न्युज कोल्हापूर, सज्जाद सय्यद ई टीव्ही भारत पुणे, गौरव मालक मॅक्स महाराष्ट्र पुणे, राजेश जगताप दैनिक जनमत अक्कलकोट, निळकंठ कांबळे दैनिक सकाळ लोहारा यांचा समावेश आहे.
What's Your Reaction?