पुणे: मंगळवार पेठेत काची वस्तीतील घराला आग; घराबाहेर बसलेली ज्येष्ठ महिला बचावली
मंगळवार पेठेतील काची वस्तीत असलेल्या एका घराला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
पुणे : मंगळवार पेठेतील काची वस्तीत असलेल्या एका घराला सोमवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीत गृहोपयोगी साहित्य जळाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
मंगळवार पेठेतील एसएसपीएम प्रशालेच्या पाठीमागील बाजूस काची वस्ती आहे. या वसाहतीत बैठी पत्र्यांची घरे आहे. सोमवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास घरातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. घरात चव्हाण कुटुंबीय राहायला आहेत. घरात कोणी नव्हते. चव्हाण यांची आजी घराबाहेर बसल्या होत्या. वस्तीतील रहिवाशांनी काही अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाच्या नायडू केंद्रात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचा बंब दोन मिनिटात तेथे पोहोचला.
What's Your Reaction?