‘पर्पल जल्लोष’ मध्ये नवउद्योजकांकडून विविध कल्पनांचे होणार सादरीकरण !

महोत्सवामध्ये ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो’ उपक्रमाच्या माध्यमातून ४० हून अधिक नवउद्योजकांचा समावेश...

Jan 15, 2025 - 14:11
Jan 15, 2025 - 14:12
 0  5
‘पर्पल जल्लोष’ मध्ये नवउद्योजकांकडून  विविध कल्पनांचे होणार सादरीकरण !

पिंपरी : दिव्यांग बांधवांना अत्याधुनिक उपकरणे व अत्याधुनिक उपाय मिळून दिव्यांग बांधवांचे सक्षमीकरण करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने  दि. १७ ते १९ जानेवारी या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या ‘पर्पल जल्लोष’ महोत्सवामध्ये ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो २०२५’ महत्वाच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर एक्स्पोमध्ये ४० हून अधिक नवउद्योजक (स्टार्टअप) आपल्या कल्पना मांडण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व दिव्यांग भवन, ग्लोबल डिसॅबिलिटी इनोव्हेशन हब (GDI) यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड येथे करण्यात आलेले आहे.  

चौकट

‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो २०२५’ मध्ये विविध प्रात्यक्षिके व प्रदर्शनांचा समावेश

‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो २०२५’ उपक्रमामध्ये मदतीमध्ये गतिशिलता आणणे, दैनंदिन कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुलभता आणणारी अत्याधुनिक साधने, सर्वसमावेशक शैक्षणिक तंत्रज्ञान अशा विविध बाबींवर तयार करण्यात आलेली उपकरणे व साधणे व नवउद्योजकांच्या याबाबत नवकल्पनांचे सादरीकरण व प्रात्यक्षिके होणार आहेत. यामध्ये संवाद सत्र, प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना अनोखा अनुभव घेता येणार आहे.

कोट –  

दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठी ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो’चे आयोजन... 

“ ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो २०२५’ उपक्रम केवळ तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी नसून यामाध्यमातून समाजाचे सक्षमीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे. सदर उपक्रम हा दिव्यांग बांधवांना सक्षम बनविण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो’ मध्ये विविध विषयांवर होणारी चर्चासत्रे व दिव्यांग बांधवांच्या विविध विषयामध्ये पुढाकार घेऊन त्यांच्या भविष्यासाठी विविध आघाड्यांवर उपाय सूचवून त्यांच्या आयुष्यामध्ये सुलभता निर्माण करणे, हा देखील मुख्य उद्देश आहे.

-    शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

चौकट 

‘पर्पल जल्लोष’ महोत्सवाची माहिती

कधी : १७ ते १९ जानेवारी २०२५

कुठे : स्थळ - ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

चौकट 

 ‘असिस्टिव्ह टेक एक्स्पो’ची प्रमुख वैशिष्ट्ये

-    दैनंदिन कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुलभता आणणारी उपकरणे

-    सर्वसमावेशक शैक्षणिक तंत्रज्ञान

-    विविध प्रात्यक्षिके

-    प्रत्यक्ष अनुभव देणारे विभाग व सत्र

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow