प्रशासन अंकुश चव्हाण ( माध्यमिक शिक्षक संघटना अध्यक्ष ) वर कधी करणार कारवाई ?
रुजू दिनांकात खाडाखोड केल्याचा आरोप

भोसरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत शिक्षक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या सेवानोंद पुस्तकातील रुजू दिनांक सेवाज्येष्ठता लाभ मिळविण्याच्या हेतूने खाडाखोड करून बदलून घेतली आहे. या संबंधित शिक्षकाचा अनेक तक्रारी शिक्षण विभागास प्राप्त झालेल्या आहेत. तरीही शिक्षकावर करवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
माध्यमिक शिक्षण विभागातील सहाकविकांची अंतिम सेवाज्येष्ठता यही प्रसिध्द झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. सहाय्यक शिक्षक अंकुरा कहाण पांची सेवाज्येहता यादीतील रुजू दिनांक मागील १३ वर्षांपासून बरोबर होती. मात्र, सन २०२४ च्या प्राथमिक सेवाज्येष्ठता यादीला संबंधित पदाधिकाऱ्याने आपली रुजू दिनांक चुकली आहे, असा आक्षेप घेतला. या आक्षेपाला पुरावा म्हणून स्वतःच्या सेवानोंद पुस्तकाच्या रुजू दिनांकाची नोंद असलेल्या पानाची प्रत मुख्याध्यापकांच्या शिफारसीने जोडली होती. त्या पुराव्याच्या आधारे माध्यमिक शिक्षण विभागाने अंतिम सेवाज्येष्ठता यादीत बदल केलेला आहे.
अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर इतर शिक्षकांनी तक्रारी केल्यानंतर शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने केलेला हा बनाव उघड झालेला आहे. संबंधित शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याविषयी या आधीसुद्धा तक्रारी माध्यमिक शिक्षण विभागात झालेल्या होत्या. परंतु, त्याच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केलेली नाही.
या सेवाज्येष्ठता यादीमुळे आम्ही ९ शिक्षक वाधित झालेलो आहोत.
भविष्यात मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी सेवाज्येष्ठता यादी हाच आधार असल्यामुळे आमच्या पदोन्नतीला अडचण निर्माण होणार आहे.
- एक सहायक शिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग
संबंधित शिक्षकाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. आम्ही त्यांना खुलासा करण्यास सांगितले आहे. खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- विजयकुमार थोरात, सहायक आयुक्त, माध्यमिक शिक्षण विभाग
What's Your Reaction?






