पिंपरी चिंचवडमध्ये 'फार्मर स्ट्रीट' यशस्वीरित्या पूर्ण

सेंद्रिय उत्पादनांच्या उपलब्धतेचा नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे

Jan 7, 2025 - 08:46
Jan 7, 2025 - 08:47
 0  4
पिंपरी चिंचवडमध्ये 'फार्मर स्ट्रीट' यशस्वीरित्या पूर्ण

पिंपरी, दि.६ जानेवारी २०२५ :- नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला ‘फार्मर स्ट्रीट’ उपक्रम हा नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यस्त जीवनातून वेळ काढून आरोग्याच्या दृष्टीकोनातून गांभीर्याने पाहण्यास नक्की मदत करेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.  

 पिंपरी चिंचवड महापालिका आणि मेसर्स अर्बनली यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ४ व ५ जानेवारी रोजी पिंपळे सौदागर येथील लिनियर गार्डन येथे ‘फार्मर स्ट्रीट’ या दोन दिवसीय उपक्रमाचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचा समारोप करतांना अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते. यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, माजी नगरसदस्य शत्रुघ्न काटे, उद्यान अधिक्षक राजेश वसावे, अर्बनली संस्थेचे अलोक कठार, महापालिकेचे कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.   

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जांभळे पाटील म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महापालिका विविध उपक्रम, कार्यक्रम राबवीत असते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेले उत्पादने, फळेभाज्या यांचा वापर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात वाढवा तसेच सेंद्रिय उत्पादनांना विक्रीसाठी मंच उपलब्ध करून देऊन नागरिकांसाठी सेंद्रिय उत्पादने उपलब्ध करून देणे, यासाठी ‘फार्मर स्ट्रीट’ हा उपक्रम आयोजित केला आहे.  ‘फार्मर स्ट्रीट’ उपक्रम महापालिकेचा प्राथमिक प्रयोग असून यापुढे देखील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतील. तसेच नागरिकांनी सेंद्रिय उत्पादनांचा आपल्या दैनदिन जीवनात उपयोग केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या आरोग्यामध्ये दिसेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, चित्रकार वैशाली भानसे यांनी महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फार्मर स्ट्रीट या उपक्रमाचे लाईव चित्र रेखाटले होते. या चित्राचे अनावरण देखील अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वैशाली भानसे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच ‘फार्मर स्ट्रीट’ या उपक्रमात सहभागी झालेल्या विविध स्टॉल धारकांचे देखील महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

महापालिकेने केले शहरातील ३१ हजार ४०० कुटुंबांमधील युवकांचे कौशल्य सर्वेक्षण

सायंकाळच्या सत्रात मावळा संस्थेचे अनिरुद्ध राजदेरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, खेळीमेळीच्या माध्यमातून महाराजांच्या इतिहासाची माहिती देणारा “रणांगण” हा खेळ सादर केला. या खेळामध्ये लहान मुलांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.  उपक्रमाच्या शेवटच्या सत्रात गायक सुस्मित यांनी “सिंग अलॉंग” या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित नागरिक आणि तरुणाईला गीत गायनात सहभागी करून घेतले. तर तरुणाई देखील मोठ्या उत्साहात गीत गायनात सहभागी झाली होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow