महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

Feb 13, 2025 - 09:25
Feb 13, 2025 - 09:26
 0  6
महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त अभिवादन

पिंपरी, दि. १२ फेब्रुवारी २०२५ : संत रविदास महाराज हे अनिष्ट रूढी परंपरा, निर्मुलनासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे थोर समाजसुधारक, कवी आणि लेखक होते. त्यांच्या व्यापक विचारांना उजाळा देऊन त्यांचे कार्य पुढील पिढीने जोपासले पाहिजे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.  

पिंपरी चिंचवड  महानगरपालिकेच्या वतीने थोर संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी  ते बोलत होते.

आतापर्यंत अनधिकृत खासगी २४ आरओ तसेच २७ वॉटर एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई!

या कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे,  विजया कांबळे, सामाजिक कार्यकर्ते  ज्ञानेश्वर कांबळे, दत्तात्रय कांबळे, दशरथ वाघमारे, प्रल्हाद कांबळे, सुदाम कांबळे, शंकरराव वाघमारे, रत्नाकर वाघमारे, सुरेश पवार, रामेश्वर पाचारे, दशरथ वाघमारे, नवनाथ वाघमारे, शामराव पवार, लिंबाजी सोनटक्के, विजय कांबळे, लखन हुलसुरे, शंकर निकम, सोमेश मुदके, किशोर साळुंखे, संभाजी गायकवाड, दत्तात्रय शिंदे, सुनील कदम, वसंत साठे, संतोष वाघमारे, वंदना वाघमारे,  सविता सोनवणे, बळीराम वाघमारे, जालिंदर थोरात, विठ्ठल आडसुळे, विष्णू सातपुते, नंदकुमार आडसूळ, शामराव भगत, अभिमान साबळे, विजय गेजगे, अनिल कांबळे, प्रशांत मळकर, अशोक जगताप, महेश कांबळे, कैलास सोनवणे आदी सामाजिक कार्यकर्ते तसेच कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.                                                                                                                                   

संत रविदास महाराज यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. त्यांनी भारतातील महाराष्ट्र, पंजाब, उत्तरप्रदेश, राजस्थान येथे जाऊन समाज प्रबोधन करण्याचे कार्य केले. त्यांची “मन चंगा तो कटौती में गंगा” यासारख्या अनेक रचना प्रसिद्ध आहेत.                                                                                      

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow