आतापर्यंत अनधिकृत खासगी २४ आरओ तसेच २७ वॉटर एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई!

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तपासणी मोहिम वेगात सुरू, पाण्याचे आतापर्यंत ५ हजार ९०५ नमुने तपासले

Feb 12, 2025 - 09:50
Feb 12, 2025 - 09:51
 0  5
आतापर्यंत अनधिकृत खासगी २४ आरओ तसेच २७ वॉटर एटीएम प्लांट्सवर महापालिकेची कारवाई!

पिंपरी, दि. ११फेब्रुवारी २०२५ : 
गिलियन बेरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेने आतापर्यंत शहरातील २४ अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सवर कारवाई केली आहे. तसेच २७ वॉटर एटीएमवर देखील कारवाई करून ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरात असणाऱ्या ६ विहिरीसह आतापर्यंत विविध ठिकाणचे एकूण ५ हजार ९०५ पाण्याचे नमुने तपासण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. 

राजकारणात येणाऱ्या नव्या पिढीला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा राजकीय प्रवास नेहमीच प्रेरणादायी राहील - शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद...

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.

गिलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रादुर्भाव व वाढत्या सार्वजनिक आरोग्यविषयक समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासण्यात येत आहेत.  महानगरपालिकेच्या वतीने वॉटर एटीएम आणि खासगी आरओ 
प्लांट्सची देखील तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे अनधिकृत वॉटर एटीएम आणि आरओ प्लांट्स आढळताच त्यावर तात्काळ कारवाई केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील २४ आरओ  व २७ वॉटर एटीएम प्लांट्सवर कारवाई केली आहे, असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow