प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात

TDNTDN
Jan 28, 2025 - 16:52
Jan 28, 2025 - 17:12
 0  7
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, येथील मराठी विभागाच्या वतीने आयोजित १४ ते २८ जानेवारी २०२५ दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा मा. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे सरांच्या मार्गदर्शनाने उत्साहात साजरा करण्यात आला. या पंधरवडा दरम्यान मराठी विभागात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्जनशील व प्रतिभा शक्ती पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यामध्ये मराठी स्वाक्षरी मोहीम, लेखक आपल्या भेटीला, निबंध, रांगोळी, सुंदर हस्ताक्षर व काव्यवाचन स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांनी या सर्व स्पर्धांमध्ये उत्साहीपणे सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचा आविष्कार त्यात दाखविला. लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमांतर्गत डॉ. मधुकर मोकाशी यांनी लोकसाहित्य व लोकसंस्कृती यांचे जतन व संवर्धन पुढील पिढीकडे कशा पद्धतीने करता येईल याविषयी आपले मत प्रकट केले.  तसेच डॉ. जयवंत अवघडे यांनी लेखक हा आपल्यातीलच एक सर्वसामान्य व्यक्ती असून तो समाजातील सत्य व वास्तव घटनांना आपल्या लेखणीने कागदावर उतरवण्याचे काम करतो. मात्र त्याचा प्रभाव हा अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांनी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रकट केले. तसेच जीवन जगत असताना आपल्यांना जगता आले पाहिजे या जगण्याच्या संघर्षात आपण भूतकाळ व भविष्याचा विचार न करता वर्तमानावर आधारित जीवनाचा आस्वाद घ्यावा असा अनुभव त्यांनी आपल्या मनोगतातन व्यक्त करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. 
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या समारोपप्रसंगी  मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. अभय खंडागळे सर यांनी मराठी भाषा आणि संस्कृती यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच मराठी ही आपली मायबोली असून तिचे जतन व संवर्धन हे आपण दैनंदिन जीवनात नियमितच करतो व ते केले पाहिजे याची जाणीव करून दिली. तसेच वेळोवेळी विभागाला सूचना करून आपल्यांना विद्यार्थी केंद्री भूमिका घेऊन त्यांच्यातील नावीन्यता ओळखून त्यांच्या कलागुणांना कसा वाव देता येईल याविषयी मत प्रकट केले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एच.बी.सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कलागुणांचे कौतुक करून भविष्यकाळात आपल्या कला कश्या जोपासाव्यात याबद्दल मार्गदर्शन केले. सन्माननीय प्राचार्य व उपप्राचार्य यांनी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमांचे तोंड भरून कौतुक केले व विभागाला प्रोत्साहन पर मार्गदर्शन करून पुढील काळात असेच नवनवीन उपक्रम राबविण्यास सांगितले. या सर्व कार्यक्रमांना महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मराठी विभाग आपणा सर्वांचे ऋणी आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय डॉ. एम.एम. बागुल मराठी विभाग प्रमुख यांनी केले. सरांनी मराठी भाषा, साहित्य संस्कृती यांच्यावर प्रकाश टाकला व त्याचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.पंकज शिरसाळे यांनी केले व आभार डॉ. संगीता लांडगे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow