21वी पशुगणना: पशुपालकांना सक्रिय सहभागासाठी आवाहन
महाराष्ट्र सरकारने जनगणनेला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नांचा विस्तार केला आहे
पिंपरी, दि. १८ डिसेंबर २०२४ : महाराष्ट्र शासनाकडील पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागामार्फत २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत २१ वी पशुगणना करण्याचे कामकाज चालू केले आहे. सदरचे पशुगणनेचे कामकाज मे. ऍनिमल हेल्थ ऑरगोनायझेशन या संस्थेमार्फत सुरु आहे. शासनाच्या विविध विकासाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणेकामी तसेच दुध, अंडी व मांस या प्रमुख पशुजन्य पदार्थाच्या उत्पादनाची आकडेवारी तयार करणेसाठी पशुगणना महत्वाची आहे.
पिंपरी चिंचवडमधील अतिक्रमण काढण्यासाठी मोठी कारवाई
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील घरगुती, संस्था व गोशाळा पशुमालकांकडे असलेल्या १६ प्रजातीपैकी (गाय वर्गीय, म्हैस वर्गीय सह पशूंसह, मिथून, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरु, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती) व कुक्कट पशी (कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग) यांची जाती निहाय, वयोगट तसेच लिंगा निहाय व उपयोगानुसार ५० प्रगणकाकडे माहिती देऊन सहकार्य करणेबाबत महानगरपालिके मार्फत पशुपालकास आवाहन करण्यात येत आहे.
What's Your Reaction?