चिखलीमध्ये अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

महानगरपालिका आणि पोलिसांनी मिळून ५५३ प्रकल्पांमध्ये निष्कासन मोहीम राबवली

Feb 14, 2025 - 10:39
Feb 14, 2025 - 10:40
 0  8
चिखलीमध्ये अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई
पिंपरी चिंचवडमधील कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेली निष्कासन मोहीम सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिली, ज्यामध्ये ५५३ बांधकाम प्रकल्प पाडण्यात आले. या कारवाईत महानगरपालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने मोठ्या प्रमाणात संसाधनांचा वापर केला आहे.

पिंपरी, दि. १३ फेब्रुवारी २०२५ : चिखली येथील कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर सलग  सहाव्या  दिवशीही निष्कासनाची कारवाई करण्यात आली.  यामध्ये ५५३ बांधकामांचा समावेश आहे. १३४ एकर क्षेत्रफळामध्ये असलेल्या भूभागावरील सुमारे ५८ लाख चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. 

पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि पोलीस यांच्च्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर,   राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमित पंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, महेश वाघमोडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह  कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले आहेत. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, विवेक पाटील, विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाआहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने " शिवशंभू शौर्यगाथा " या भव्य महानाट्यासह शाहिरी, व्याख्यान,शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन...

या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले आहेत. ४४  पोकलेन, ८  जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका येथे तैनात करण्यात आल्या आहेत. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील कारवाईमध्ये सहभागी झाले आहेत. 
महापालिकेच्या आरक्षित जागा तसेच विकास रस्त्यांवर असलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच या भागात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow