दिल्ली साहित्य संमेलनाची सुरवात पिपंरी चिंचवड पासून...... संमेलन पूर्व कविसंमेलन रंगले

Feb 18, 2025 - 14:12
Feb 18, 2025 - 14:13
 0  6
दिल्ली साहित्य संमेलनाची सुरवात पिपंरी चिंचवड पासून...... संमेलन पूर्व कविसंमेलन रंगले

दिल्ली येथे होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना च्या तुतारीचा नाद चिंचवड  येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या शान्ता शेळके सभागृहात घुमला. निमित्त होते संमेलन पूर्व कविसंमेलन. 

सरहद पुणे आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित  कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या "गंध मातीचा" या कविसंमेलनात पुणे व पुणे जिल्ह्यातील मंचर, चाकण, जुन्नर, राजगुरु नगर, तळेगाव येथील कवी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी व्यासपीठावर मसाप पुणे चे उपाध्यक्ष राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, दिग्दर्शक अविनाश कांबीकर, समन्वयक अशोक भाम्बुरे उपस्थित होते.
 २१, २२, २३ रोजी दिल्लीत होणाऱ्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर हे कविसंमेलन महत्वाचे ठरले.  दिल्लीत होणाऱ्या "कविकट्टा" या व्यासपीठावर कविता सादरीकरणासाठी १००० च्या वर कविता प्राप्त झाल्या होत्या. त्यातून कविता निवड समितीने १८० कवितांची निवड केली. त्यामुळे पुणे व पुणे जिल्ह्यातील ज्या कवींची निवड झाली नाही त्यांना या कविसंमेलनात प्राधान्य देण्यात आल्याचे दिल्ली येथे होणाऱ्या कवी कट्ट्याचे प्रमुख राजन लाखे यांनी सांगितले. अरुण म्हात्रे यांनी कविता कशी असावी यावर भाष्य करून मार्गदर्शन केले. बर्वे यांनीही मनोगत व्यक्त करताना मसाप पिपंरी चिंचवड शाखा महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवप्रधान उदगार काढले.
सदर कार्यक्रमात सुलतान या लघुपटाचे दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांच्या त्यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल मसाप तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
सदर कविसंमेलनात विलास वानखेडे, तेजश्री पाटील, राजेंद्र घावटे,  सुनीता बोडस, बाळकृष्ण अमृतकर, नीलिमा फाटक, सुहास घुमरे, प्रतिमा काळे, ज्ञानेश्वर धुमाळ,  जयश्री श्रीखंडे, नंदकुमार मुरडे, अर्चना गोरे, मोहन जाधव, रेखा कुलकर्णी, उद्धव महाजन, कांचन नेवे, राजेश चौधरी, ऋचा कर्वे, सीताराम नरके, संध्या गोळे, मनीषा सराफ, स्नेहल भोर, उर्मिला व्यवहारे, सुनेत्रा गायकवाड, आशा नवले यांनी विविध विषयावरील वैविध्यपूर्ण कविता सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. सदर कवींना  सन्मानचिन्ह देण्यात आले.
 दिल्ली येथे सादरीकरणासाठी निवड झालेले  हेमांगी बोंडे, संजय जगताप, किरण जोशी तसेच परिसंवादात निवड झालेले मावळ तालुक्याचे प्रभाकर ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला.
श्रीकांत जोशी, किरण लाखे  यांनी संयोजन केले. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow