क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन

Feb 18, 2025 - 13:59
Feb 18, 2025 - 14:00
 0  6
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन

पिंपरीदि. १७ फेब्रुवारी २०२५ :-  क्रांतीगुरु  लहुजी वस्ताद साळवे हे प्रखर देशभक्त आणि थोर क्रांतिकारक होते. तसेच त्यांनी हजारोंच्या संख्येने क्रांतीकारकांची फौज उभी करून इंग्रजांविरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले तर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी देखील इंग्रजांविरुद्ध अखेरपर्यंत लढा दिला. अशा या दोन्ही क्रांतिवीरांच्या कार्यातून सर्वांनी देशभक्तीची प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

क्रांतीगुरु  लहूजी वस्ताद साळवे आणि क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील  त्यांच्या प्रतिमेस आणि  चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या  पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले,  त्यावेळी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सुधारित अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी

यावेळी उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष नितीन घोलप, संदीपान झोंबाडे, अण्णासाहेब कसबे, युवराज दाखले, सतीश भवाळ, शिवाजी खडसे, मंगेश डाखोरे, बाबासाहेब पाटोळे, अविनाश शिंदे, राजू आवळे, शंकर खवळे, लहू आडसूळ, आनंद कांबळे, करण कांबळे, बाळू कुचेकर, संतोष आवळे, अर्जुन गौणे, नाना कांबळे, गणेश कळवले, अनिकेत साळवे, राहुल सावंत, नारायण गायकवाड, अविनाश गायकवाड, ज्योतीताई शिंदे, ऋषिकेश वाघमारे,  डॉ. धनंजय भिसे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.      

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow