सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

TDNTDN
Jan 1, 2025 - 11:57
Jan 1, 2025 - 11:58
 0  2
सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या  कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई दि. ३१ :- साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या

सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,
राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हे तंत्रज्ञान वापरतात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते  फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात 100 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार 300 मे. टन ते 1000 मे. टनाची गोडाऊन बांधण्यात येणार आहेत. या योजनेतून  गडचिरोली नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभी करावीत. तचेच सहकारी गृह निर्माण संस्थांचे 100% डिजिटलायझेशन करण्यावर भर द्यावा.  साखर कारखान्यांना देण्यात आलेला मर्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष राहावे, अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वन हक्क पट्ट्यांचे जतन करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow