पिंपरी चिंचवड महानगरपालिका समारंभ: २० कर्मचाऱ्यांचा निरोप
पिंपरी, दि. ३१ जानेवारी २०२५ :- सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे जबाबदारीने व प्रामाणिकपणाने केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या लौकिकात भर पडली असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कामाचा आदर्श महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुढील आरोग्यदायी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे माहे जानेवारी २०२५ अखेर नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ३ अशा एकूण २० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, त्यावेळी त्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी अनिल पासलकर,चारूशिला जोशी, प्रशासन अधिकारी डी.डी.कांबळे,कर्मचारी महासंघाचे नंदकुमार इंदलकर,विजया कांबळे,बालाजी अय्यंगार,रमेश लोंढे,एकता कर्मचारी संघटनेचे गणेश भोसले यांसह विविध विभागातील कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ विलास डांगरे यांचे घरी जावून केले अभिनंदन
नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी आनंद गायकवाड, उपलेखापाल सरीता मोरे, प्रयोगशाळा सहाय्यक किशोर नांगरे, लिपीक नितीन येम्बर, कॉम्प्युटर ऑपरेटर शैलेंद्र पानसरे, उपशिक्षक बिभिषण फलफले, मुकादम अनुसया घोटकुले, शिपाई महेंद्र घोणे, नाईक राजेंद्र गावडे, आया शोभा कोद्रे, मजूर संजय शिंदे, तुकाराम गायकवाड, गजानन सांडभोर, परवीन नदाफ, सफाई कामगार कमल गायकवाड, सफाई सेवक मनोहर सारसर, कचरा कुली मोहन साबळे यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आया वृषाली चौधरी, सफाई कामगार मंदा राखपसरे, गटरकुली मनोहर अवतारे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
What's Your Reaction?