जनसंवाद सभेच्या कामकाजाचे विनियमन करण्यासाठी नियमावली
पिंपरी, १८ फेब्रुवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण जलद गतीने होण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. जनसंवाद सभेत येणाऱ्या नागरिक व तक्रारींची संख्या अधिक असल्यामुळे सभेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी कामकाजाचे विनियमन करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.
महापालिकेच्या वतीने महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते, त्यामुळे सुसुत्रता आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकात क्षेत्रीय अधिकारी आणि नागरिकांसाठी विविध सूचना मांडण्यात आल्या असून या सूचनांची काटेकोरपणे अंबलबजावणी करावी.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा: तरुण पिढीसाठी मार्गदर्शक
या परिपत्रकात सर्व नागरिकांची आसन व्यवस्था प्रतिक्षा कक्षात करावी, नागरिकांच्या तक्रारी नमूद करण्यासाठी अर्जाचा नमुना भरून घ्यावा, प्रत्येक व्यक्तीसाठी वेळ मर्यादा निश्चित करण्यात आली असून नागरिकाची तक्रार समजावून घेतल्यानंतरच दुसरी तक्रार घेण्यात यावी, अधिकारी कर्मचारी यांनी जनसंवाद सभेत सुनिश्चित वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी, तक्रारदार यांचे नाव गोपनीय राहील याची दक्षता घ्यावी, नागरिकांना जनसंवाद सभेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार नाही, जनसंवाद सभेतील अहवाल आणि माहिती पत्रकारांना जनसंवाद सभा संपल्यानंतर देण्यात यावी, जनसंवाद सभा झाल्यानंतर नागरिकांचा अभिप्राय नोंदवून घेऊन भविष्यातील सुधारणांबाबत आढावा घ्यावा असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
What's Your Reaction?