उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूत वृक्षारोपण

Feb 10, 2025 - 08:25
Feb 10, 2025 - 08:26
 0  3
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देहूत वृक्षारोपण
पिंपरी : शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा देहूगाव व रूक्षदायी प्रतिष्ठान यांच्या वतीने रुक्षरोपण करण्यात आले.
यावेळी खासदार बारणे यांच्यासह श्री तीर्थक्षेत्र देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, ह.भ.प माणिक महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज मोरे, देहूगाव शिवसेना शहरप्रमुख सुनिल हगवणे, ह.भ.प जालिंदर महाराज मोरे, माजी नगरसेवक गणेश हगवणे, देहूगावचे भाजप शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल, माजी उपसरपंच सचिन साळुंखे, शिवसेना महिला मावळ तालुका प्रमुख शुभांगी काळंगे, शिवसेना शहर संघटिका शितल पवार, माजी उपसरपंच संतोष हगवणे व नागरिक यावेळी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. जनतेशी समग्र होऊन काम करतात. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील विकास कामावर लक्ष असते. नगरविकास खात्याच्या माध्यमातून मावळ मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत. नगरविकास खाते, खासदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीमधील मोठा निधी मावळच्या विकासासाठी खर्ची केला जात आहे. भविष्यातही मावळसह देहूच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. देहू शहर मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. त्यामुळे देहूचा नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही खासदार बारणे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow