दिव्यांग जल्लोष दिंडीने पर्पल जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात

Jan 17, 2025 - 17:32
Jan 17, 2025 - 18:04
 0  8
दिव्यांग जल्लोष दिंडीने पर्पल जल्लोष कार्यक्रमाला सुरुवात

पिंपरी :  भारतीय संविधानाचा जल्लोष करीत पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्पल जल्लोष कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी (१७ जानेवारी) दिव्यांग जल्लोष दिंडीने करण्यात आली. भारतीय संविधानाची प्रास्ताविकेची प्रतिमा, दिव्यांग अधिकार कायदा, शिक्षण कायदा प्रत पालखीमध्ये ठेवून त्याची दिंडी यावेळी काढण्यात  आली.  पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या दिंडीला सुरुवात झाली. 

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची वाढती संख्या

दिव्‍यांग बांधवांना समाजाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणत त्‍यांचे सक्षमीकरण करण्‍याच्‍या उद्देशाने तीन दिवसांचा ‘पर्पल जल्‍लोष’ हा दिव्यांग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, कार्पोरेट कंपन्या, संस्थांच्या सहभागाद्वारे दिव्यांगांसाठी शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा यासह विविध क्षेत्रातील नवनवीन संधींचे दारे उघडली जाणार आहेत. १७ जानेवारी ते १९  जानेवारी २०२५  याकाळात चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्र येथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात दिव्यांग जल्लोष दिंडीने उत्साहात झाली. 

सायन्स पार्क येथून दिंडीला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते दिंडीला सुरुवात झाली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा संचालक तानाजी नरळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, मानव कांबळे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी यांच्यासह पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळ संचलित निवासी अपंग विद्यालयाचे विद्यार्थी वारकरी वेषभूषेत सहभागी झाले होते.  

डॉ. बाबा साहेब आंबेडकर आणि संविधानाचा कायम सन्मान भाजपा सरकारने च केला

दिव्यांग जल्लोष दिंडी पर्पल जल्लोष कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर तिचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिथे संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर पर्पल जल्लोष मधील साहित्य जत्रेला सुरुवात झाली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow