इंदुरी येथे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयामार्फत जिल्हा स्तरीय किल्ले संवर्धन कार्यशाळा संपन्न
प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी -४४ (स्वायत्त) राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ऐतिहासिक स्थळे योजनेतंर्गत किल्ले संवर्धन (इंदुरी किल्ला) एक दिवसीय जिल्हा स्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यशाळेत विविध महाविद्यालयातील 58स्वंयसेवक सहभागी झाले होते. किल्ले संर्वधन उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी इंदुरी गावाचे सरपंच श्री. निशिकांत शिंदे ,भटकंती सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. निलेश मांडेकर, खजिनदार श्री. अनिकेत भांगरे, कु. राहुल कुंभार रा. से. यो . जिल्हा समन्वयक डॉ सारिका मोहोळ सर्व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. मा. श्री. निलेश मांडेकर यांनी विद्यार्थ्यांनी गडाचा इतिहास, दाभाडे घराण्याची इतिहासातील शौर्य परंपरा तसेच गडीतील विविध वास्तूची माहिती आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांना दिली.
महावितरणचे नवीन टीओडी मीटर; प्रीपेड नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाचे!
स्वयंसेवकांनी किल्ल्यामधील कडजाई मंदिर,बापूजीबुवा मंदिर परिसरातील प्लास्टिक संकलन करून परिसर स्वच्छ केला.तसेच गडामध्ये उभारण्यात आलेल्या 66 फूट ध्वजाच्या सभोवतालील बागकाम करून वृक्षारोपण केले.
सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. एच.बी. सोनवणे,प्रबंधक श्री. संजय झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. सारिका मोहोळ , कार्यक्रम अधिकारी डॉ. मधुकर राठोड प्रा. . वैभव साळवे, आणि प्रा.ज्योती झेंडे, प्रा.वि
What's Your Reaction?